शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

मी आहे नवीन डीन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:32 AM

रुग्णालय परिसरात विनामास्क वावर : सहयोगी प्राध्यापकाचा प्रताप, डॉ. पोटे यांनी मागविला खुलासा

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीर क्रियाशास्त्र विभागाच्या एक सहयोगी प्राध्यापक चंद्रशेखर डांगे हे थेट अधिष्ठातांच्या खुर्चीवर विराजमान झाले़ त्यावेळी आपण नवीन डीन असल्याचे त्यांनी सांगितल्यावर उपस्थितही चक्रावले. प्रभारी अधिष्ठाता डॉ़ मारूती पोटे यांनी तात्काळ या प्राध्यापकाला नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी दुपारी हा प्रकार घडला.डीन कॅबीनमध्ये गेल्यानंतर संबधित प्राध्यापकाने अन्य कर्मचाऱ्यांच्या पाया पडल्या़ बराच वेळ चाललेल्या या प्रकारानंतर या प्राध्यापकाने थेट डीन यांची खुर्ची सांभाळली व त्यावर ते थेट विराजमान झाले़ आजुबाजुलाही काही प्रमुख डॉक्टर बसलेले होते़ या प्राध्यापकांच्या या प्रतापाचा व्हिडीओ काही सेंकदातच सोशल मीडियावर व्हायलर झाला.विशेष बाब या प्राध्यापकांनी मास्क किंवा सुरक्षा साहित्य परिधान केलेले नव्हते़ सध्या अधिष्ठांतांच्या खुर्चीवरून जळगावच्या शासकीय महाविद्यालयात रणांगण सुरू असल्याचे चित्र असतानाच या प्राध्यापकाने खुर्चीवर बसणे हा चर्चेचा विषय झाला आहे़मी आहे नवीन डीन...हे प्राध्यापक महोदय जवळपास अर्धा तास अधिष्ठाता यांच्या कार्यालयात होते. अनेक वेळा त्यांनी असा प्रकार केला असून काही दिवसांपूर्वीही ते अशाच प्रकारे थेट दालनात आले होते़ त्यांचे वाहनही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे़ दरम्यान, खुर्चीवर बसल्यानंतर आपण या ठिकाणी नवीन डीन म्हणून रूजू झालो असून आपली कोरोनाची टीम असून कोरोनाबाबत नियोजन करीत असल्याचे ते सांगत होते़ बराच वेळ हा गोंधळ सुरू होता़ दोन दिवसांपूर्वीही ते आले व थेट टेबलवर पाय ठेवून बसल्याची माहिती समोर आली आहे़ दरम्यान, यावेळी गोंधळ उडाला होता़तर थेट संचालकांकडे तक्रारप्रभारी अधिष्ठाता पोटे यांनी या प्राध्यापकाला नोटीस बजावून दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत़ खुलासा व्यवस्थित नसल्यास थेट संचालकांकडे यासंदर्भात तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती डॉ़ पोटे यांनी दिली आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव