शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

भयानक! शिकवणीला जाणाऱ्या २ मुलींना माथेफिरूने विहिरीत ढकललं; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 23:16 IST

Bhusawal Sakari village incident : जळगाव जिल्ह्यातील साकरी (भुसावळ) येथे शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना एका माथेफिरूने विहिरीत ढकलल्याची धक्कादायक घटना.

भुसावळ (जळगाव): जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावातून एक अत्यंत संतापजनक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. नेहमीप्रमाणे शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना एका माथेफिरू तरुणाने थेट विहिरीत ढकलून दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर साकरी गावातील नागरिकांनी तातडीने धाव घेत मुलींना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केले होते.

साकरी येथील दोन अल्पवयीन मुली आज नेहमीप्रमाणे घराकडून शिकवणीसाठी निघाल्या होत्या. त्याचवेळी गावातीलच रोहन चौधरी नावाच्या एका माथेफिरू तरुणाने या मुलींना वाटेत अडवले. काही समजण्याच्या आतच त्याने या दोन्ही मुलींना जवळच असलेल्या शेतातील विहिरीत ढकलून दिले. मुलींच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांची तातडीची कारवाईघटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलिसांनी साकरी गावात धाव घेतली. जळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संशयित आरोपी रोहन चौधरी याला तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश दिले. पोलिसांनी अवघ्या काही वेळातच या माथेफिरूच्या मुसक्या आवळल्या आहेत.

भय आणि संतापाचे वातावरणया घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, दिवसाढवळ्या घडलेल्या या कृत्यामुळे भुसावळ तालुक्यात पालकांमध्ये भीतीचे तर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Horrific: Madman Throws Two Tutoring Girls into Well; Arrested

Web Summary : In Bhusawal, a deranged youth threw two girls into a well while they were going to tuition. Villagers rescued them, and police promptly arrested the accused, Rohan Choudhary. The incident has sparked fear and anger.
टॅग्स :Jalgaonजळगाव