राधाकृष्ण प्रभात फेरी परिवारातर्फे सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST2021-07-15T04:13:56+5:302021-07-15T04:13:56+5:30

भुसावळ : येथील डॉ. नितीन पाटील यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत अतिशय चोखपणे सेवा बजावली. खासगी सेवेच्या माध्यमातून त्यांनी ...

Honored by Radhakrishna Prabhat Ferry family | राधाकृष्ण प्रभात फेरी परिवारातर्फे सन्मान

राधाकृष्ण प्रभात फेरी परिवारातर्फे सन्मान

भुसावळ : येथील डॉ. नितीन पाटील यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत अतिशय चोखपणे सेवा बजावली. खासगी सेवेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रुग्णांना धीरही दिला. त्यांच्या या कार्याची दखल घेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मुंबई यशवंतराव चव्हाण सेंटर येथे कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शहरातील राधाकृष्ण प्रभातफेरी परिवारातर्फेही डॉ. नितीन पाटील यांना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी राधेश्याम लाहोटी, दिनेश राठी, जे. बी. कोटेचा, संजय अग्रवाल, प्रकाश अग्रवाल, द्वारकादास हेडा, नीलेश वर्मा, जगदीश शर्मा, श्याम काबरा, नितीन सुराणा, गौतम चोरडिया, सुरेश काबरा, मदन बोरकर, लीलाधर अग्रवाल, संजय फालक, अशोक फालक, विलास पवार, देवा अग्रवाल उपस्थित होते.

Web Title: Honored by Radhakrishna Prabhat Ferry family