महामार्गावर दळवेलनजीक कांद्याचा ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 12:55 IST2018-07-01T12:52:50+5:302018-07-01T12:55:58+5:30
वाहनाचे नुकसान

महामार्गावर दळवेलनजीक कांद्याचा ट्रक उलटला
ठळक मुद्देकोणाला दुखापत नाहीबघ्यांची गर्दी
पारोळा, जि. जळगाव : धुळेकडून पारोळाकडे कांदा घेऊन जाणारा ट्रक (पी. बी. ०२, सी. आर. ७४७६) आशिया महामार्ग ४६ वर दळवेल गावानजीक उलटल्याने कांदा अस्ताव्यस्त पसरून ट्रकचेही नुकसान झाले.
कांद्याच्या गोण्या भरलेल्या हा ट्रक भरधाव वेगात जात असताना अचानक रस्त्याच्या कडेला खड्यात उलटला. यामुळे सर्वत्र कांदा विखुरलो गेला. विखुरलेल्या गोण्या लगेच दुसरा ट्रक बोलवून त्या टॅक मध्ये भरण्यात आल्या. या अपघातात ट्रक आणि मालाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नाही. अपघातानंतर येणाऱ्या- जाणाºयांची गर्दी झाली होती.