जोरदार पावसामुळे जळगाव झाले ‘जलमय’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 16:29 IST2019-08-05T16:27:15+5:302019-08-05T16:29:59+5:30

सोमवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसाने जळगाव अक्षरश: जलमय झाले. अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. 

Heavy rain triggers 'waterlogging' in Jalgaon | जोरदार पावसामुळे जळगाव झाले ‘जलमय’ 

जोरदार पावसामुळे जळगाव झाले ‘जलमय’ 

जळगाव - सोमवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसाने जळगाव अक्षरश: जलमय झाले. अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. 

रामानंद  नगर परिसरातील नाल्याला मोठाच पूर आल्याने शाळेतून परतणारे विद्यार्थी आणि वाहन धारकांना बराच वेळ अडकावे लागले.  पालक आणि विद्यार्थ्यांना एकमेकांच्या हातात हात घेऊन साखळी बनवित हा नाला पार करावा लागला. 

याशिवाय भोईटे नगर रेल्वेगेट  ते शाहूनगरापर्यंत गुडघाएवढे पाणी साचले होते.  त्यामुळे नागरिक आणि वाहनधारकांना पाणी कमी होण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. याशिवाय शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. 
 

Web Title: Heavy rain triggers 'waterlogging' in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव