चाळीसगावात मुसळधार पावसाची हजेरी; नागद रोड परिसरात अनेक घरांमध्ये घुसले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 10:34 IST2022-07-28T10:33:11+5:302022-07-28T10:34:27+5:30

बुधवारी रात्री चाळीसगाव आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली.

heavy rain in chalisgaon water entered many houses | चाळीसगावात मुसळधार पावसाची हजेरी; नागद रोड परिसरात अनेक घरांमध्ये घुसले पाणी

चाळीसगावात मुसळधार पावसाची हजेरी; नागद रोड परिसरात अनेक घरांमध्ये घुसले पाणी

चाळीसगाव: बुधवारी रात्री चाळीसगाव आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे  नागद रोड परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये रात्री ११ वाजता पाणी शिरल्याने रहिवाश्यांची तारांबळ उडाली. 

घरात पाणी शिरल्याने अंथरुणासह, खाण्या - पिण्याच्या वस्तू भिजल्या. या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी शिरले. नागरिकांनी पाण्याच्या मोटारी लावून घरातील पाणी उपसले. यामुळे नागरिकांचे मोठया प्रमाणावर हाल झाले अंथरुणासह खाण्यापिण्याच्या वस्तू पाण्यात भिजल्या. स्थानिक नागरिकांनी पालिकेवर तसेच लोकप्रतिनिधींवर रोष व्यक्त केला. गटारी साफ न केल्याने आमच्या घरांमध्ये पाणी शिरले. आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. पालिकेमुळे आम्हाला हा त्रास सहन करावा लागतो, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
 

Read in English

Web Title: heavy rain in chalisgaon water entered many houses