आमदाराने अडवला गुटख्याचा ट्रक, पोलिसांनी घेतला ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 12:20 IST2020-10-17T12:19:48+5:302020-10-17T12:20:27+5:30
यावर पोलीस व आमदार चव्हाण यांच्यात बराचवेळ वाद झाला. त्यानंतर पोलीस अधीक्षक यांच्या सुचनेवरुन हा ट्रक औद्योगिक वसाहत पोलिसात जमा करण्यात आला आहे.

आमदाराने अडवला गुटख्याचा ट्रक, पोलिसांनी घेतला ताब्यात
जळगाव : धुळ्याहून चाळीसगावकडे येणारा जवळपास ५० लाखांचा गुटखा पकडण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री ८.३० वा. मेहुणबारे (ता. चाळीसगाव ) येथे घडली. दरम्यान गुटख्याचा ट्रक जळगावकडे नेत असतांना चाळीसगाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शनिवारी पहाटे ४ वाजता जळगावनजीक अडविला.
यावर पोलीस व आमदार चव्हाण यांच्यात बराचवेळ वाद झाला. त्यानंतर पोलीस अधीक्षक यांच्या सुचनेवरुन हा ट्रक औद्योगिक वसाहत पोलिसात जमा करण्यात आला आहे. गुटख्याच्या ट्रकवर चाळीसगाव येथेच गुन्हा दाखल होणे गरजेचे आसतानाही गाडी जळगांवपर्यंत आलीच कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.