फैजपूरात साडेसात लाखाचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 23:38 IST2020-12-09T23:37:13+5:302020-12-09T23:38:04+5:30

फैजपूर शहरात असलेल्या गुटख्याच्या साठ्यावर छापा मारून पोलिसांनी साडेसात लाख रुपये किमतीचा गुटखा ताब्यात घेतला.

Gutka worth Rs 7.5 lakh seized in Faizpur | फैजपूरात साडेसात लाखाचा गुटखा जप्त

फैजपूरात साडेसात लाखाचा गुटखा जप्त

ठळक मुद्देमिल्लत नगर भागात बुधवारी सायंकाळी टाकला छापा.

लोकमत न्यूज नटवर्क

फैजपूर  : शहरात असलेल्या गुटख्याच्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व स्थानिक पोलिस यांनी  छापा मारून साडेसात लाख रुपये किमतीचा गुटखा ताब्यात घेतला. एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिल्लत नगर भागात बुधवारी सायंकाळी सहा वाजता हा छापा टाकण्यात आला.
शहरात अशा प्रकारची गुटखा विक्रेत्यांवर होणारी ही पहिलीच मोठी कारवाई आहे. मोहसीन शेख युनूस उर्फ कल्लू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
  शेख मोहसीन यांच्या घराच्या मागील बाजूस   गुटखा व तंबाखू गोण्यामध्ये  भरलेला आढळून आला. यात सात लाखाचा  रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर यांच्या नेतृत्वाखाली सहकारी किशोर साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे, फौजदार रोहिदास ठोंबरे,  हेडकॉन्स्टेबल रवींद्र मोरे, अनिल महाजन, उमेश चौधरी, चेतन महाजन यांनी संयुक्तरित्या केली
 

Web Title: Gutka worth Rs 7.5 lakh seized in Faizpur