गुरुजी माध्यमिक विद्यालय वडती ता. चोपडा येथील २ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:20 IST2021-08-24T04:20:15+5:302021-08-24T04:20:15+5:30

गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना इ. ९ वी ते १२ वीपर्यंत प्रतिवर्ष प्रत्येकी १२ हजार रुपये म्हणजे चार वर्षात ...

Guruji Madhyamik Vidyalaya Vadati Ta. 2 students from Chopda in merit list | गुरुजी माध्यमिक विद्यालय वडती ता. चोपडा येथील २ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

गुरुजी माध्यमिक विद्यालय वडती ता. चोपडा येथील २ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना इ. ९ वी ते १२ वीपर्यंत प्रतिवर्ष प्रत्येकी १२ हजार रुपये म्हणजे चार वर्षात एका विद्यार्थ्यासाठी ४८ हजार मिळतात. यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खूप मोठी आर्थिक मदत होते.

विद्यालयातील एकूण ९ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी ०२ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.

७ वर्षांपासून एनएमएमएस परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान कायम ठेवण्याची परंपरा या विद्यालयाने सुरू ठेवली आहे. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी आइसा हमीद तडवी, रिजवाना खलील तडवी या विद्यार्थिनी आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गुलाबराव पाटील, उपाध्यक्ष एम. एस. चित्रकथी, सेक्रेटरी, दीपक भास्कर जोशी तसेच सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक संजय हरी जोशी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

Web Title: Guruji Madhyamik Vidyalaya Vadati Ta. 2 students from Chopda in merit list