बुलढाणा बस अपघातस्थळी पालकमंत्री गुलाबराव पाटील रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 09:35 IST2023-07-01T09:33:49+5:302023-07-01T09:35:19+5:30

बुलढाणाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना ही घटना कळल्यानंतर ते थोड्या वेळापूर्वी जळगाव जिल्ह्यातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून बुलढाणाच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Guardian Minister Gulabrao Patil left for Buldhana bus accident site | बुलढाणा बस अपघातस्थळी पालकमंत्री गुलाबराव पाटील रवाना

बुलढाणा बस अपघातस्थळी पालकमंत्री गुलाबराव पाटील रवाना

- प्रशांत भदाणे

जळगाव : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे खाजगी बसला भीषण अपघात झाल्याने 25 प्रवासी मृत्युमुखी पडल्याची घटना आज पहाटे समृद्धी महामार्गावर घडली. हा अपघात एवढा भीषण होता की बसला आग लागल्यामुळे 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. बुलढाणाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना ही घटना कळल्यानंतर ते थोड्या वेळापूर्वी जळगाव जिल्ह्यातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून बुलढाणाच्या दिशेने रवाना झाले आहेत.

रुग्णालयात जाऊन ते जखमींची विचारपूस करणार असून या घटनेत जे कोणी मृत्युमुखी पडले आहेत, त्यांच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी, त्याचप्रमाणे जखमींना देखील मदत मिळावी, याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण चर्चा करणार असल्याचे गुलाबराव पाटलांनी बुलढाणाकडे निघताना सांगितले.

याचबरोबर, समृद्धी महामार्गावरून जात असताना बसचा एक्सल तुटल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. हा अपघात दुर्दैवी घटना असून, या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तातडीची मदत मिळावी, म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचेही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

बस विदर्भ ट्रॅव्हल्सची 
विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई-१८१९ क्रमांकाची ही बस नागपूर वरुन पुण्याकडे जात होती. ३० जून रोजी नागपूरहून सायंकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलैच्या रात्री १.२२ मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली.त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवाशी बस पेटली. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या ३३ प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत.  

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: Guardian Minister Gulabrao Patil left for Buldhana bus accident site