देवगावात सापडले हाडे भरलेले पोते

By Admin | Updated: June 20, 2017 12:34 IST2017-06-20T12:34:51+5:302017-06-20T12:34:51+5:30

देवगाव मुंदाणे रस्त्यावर एका शेतात हाड भरलेल्या पोत्यांसह बेवारस सायकल आढळल्याने खळबळ उडालेली आहे.

Grown grandsons found in Devgarh | देवगावात सापडले हाडे भरलेले पोते

देवगावात सापडले हाडे भरलेले पोते

 ऑनलाईन लोकमत 

देवगाव,ता.पारोळा,दि.20 : देवगाव मुंदाणे रस्त्यावर एका शेतात  हाड भरलेल्या पोत्यांसह बेवारस सायकल आढळल्याने खळबळ उडालेली आहे. ही हाडे प्राण्याची की मानवाची, ती कशासाठी गोळा करण्यात आली आदी प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे. 
पारोळा कजगाव रस्त्यावरील देवगाव फाटा ते मुंदाणे फाटा या दरम्यान मुंदाणे येथील काशिनाथ किसन हटकर यांचे शेत आहे.त्या शेतात हाडाने भरलेले पोते, कु:हाड, व एक बेवारस सायकल आढळून आल्याचे शेतक:याच्या लक्षात आले. या प्रकारामुळे परिसरातील शेतक:यांमध्ये खळबळ उडालेली आहे. 
दरम्यान, पोत्यामध्ये आढळलेले हाडे ही कु:हाडीने तोडलेली आहेत. ही हाडे कोणत्या प्राण्याची आहेत? हाडांचा व्यवसाय तर कोणी करत नसेल ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. तसेच सायकल बेवारसस्थितीत सोडून जाण्याचे कारणही समजू शकलेले नाही. 
दरम्यान, ही बाब अद्यापर्पयत पोलिसांर्पयतही पोहचविण्यात आलेली नाही. पोलिसांनी या घटनेचा शोध घ्यावा अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Grown grandsons found in Devgarh