शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

भूजल संकटाच्या घशात अडकली मक्याची कणसे, गव्हाची ओंबी व हरभऱ्याचे घाटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 13:15 IST

रावेर तालूक्यातील सातपुड्याच्या पायथ्यापासून ते थेट तापीमाईच्या सुपीक पठाराच्या उशाशी हतनूरसह सुकी, आभोडा, मंगरूळ, गंगापूरी, मात्राण व चिंचाटी अशा लहान मोठी सहा धरणे असली तरी अत्यल्प, अनियमित व अकाली झालेल्या पावसामुळे यंदा उन्हाळ्यातील एप्रिल - मे जाणवणारी भूजलाचे संकट गत डिसेंबरच्या उत्तरार्धापासूनच घोंघावू लागले आहे.

रावेर - तालूक्यातील सातपुड्याच्या पायथ्यापासून ते थेट तापीमाईच्या सुपीक पठाराच्या उशाशी हतनूरसह सुकी, आभोडा, मंगरूळ, गंगापूरी, मात्राण व चिंचाटी अशा लहान मोठी सहा धरणे असली तरी अत्यल्प, अनियमित व अकाली झालेल्या पावसामुळे यंदा उन्हाळ्यातील एप्रिल - मे जाणवणारी भूजलाचे संकट गत डिसेंबरच्या उत्तरार्धापासूनच घोंघावू लागले आहे. तालूक्याच्या पुर्व भागातील खानापूर, निरूळ, पाडळे, चोरवड, कर्जोद, या भागासह सुकीकाठचा परिसरात भूजलसंकटाची  कमालीची गंभीर दाहकता निर्माण झाली असून, या दीड महिन्यात सहा ते सात मीटरने भूजलपातळी घसरल्याने धरणांच्या या तालूक्यात मका गहू, हरभऱ्यासह १९ हजार हेक्टरमधील रब्बी हंगामाचा घास भूजलसंकटाच्या घशात अडकला असून आजमितीस शेतकरीबांधव कमालीचे चिंताक्रांत झाले आहेत.                रावेर तालूक्याला केळीच्या समृद्धीचे गतवैभव असलेल्या खर्‍या यशाचे गमक हतनूर, सुकी, आभोडा, मंगरूळ, गंगापूरी, मात्राण व चिंचाटी या लहानमोठी धरणांच्या सप्तजलतारकांना जाते. यंदा पाऊस अकाली,अपुर्ण व अनियमीतपणे झाल्याने ही धरणं नुसतीच आकडेवारीने १०० टक्के तुडूंब भरलीत. पण भूजलपातळी वृध्दींगत करण्यासाठी  पावसाळ्यात पुरांअभावी सातपुड्यातून वाहून येणाऱ्या सुकी, भोकर, नागोई, मात्राण नद्या नाले मात्र दुथडी भरून न वाहिल्याने भूजल सिंचनाचा प्रश्न " आ"वासूनच राहिला.           परिणामतः  भर पावसाळ्यात डोळे वटारणार्‍या पावसाने शेवटच्या दोन तीन पावसात १०० टक्के पर्जन्यमान व  धरणे १०० टक्के तुटूंब भरल्याची माहिती दर्शवली जात असली तरी सात धरणांचा तालूका असलेल्या या तालुक्यात एवढी सात धरणं उशाशी असूनही, डिसेंबर- जानेवारी  पूर्वार्धापासूनच या तालुक्याच्या दाही दिशांना भूजलसंकटाची भीषण दाहकता प्रशासनाची व शासनाची झोप उडवणारी ठरली आहे. त्यात भरीस भर म्हणून तालूक्याच्या पुर्व भागातील चोरवड, अजनाड, खानापूर, निरूळ व पाडळे परिसरात राजकीय इच्छाशक्तीअभावी सिंचनाचा अनुशेष आ वासून असल्याने भूजलाच्या संकटाने उग्र स्वरूप धारण केले आहे. खानापूर - चोरवड-निरूळ परिसरात तब्बल ५ ते १० मीटरने भूजलपातळी मकरसंक्रांतीच्या पर्वणीवर होणाऱ्या सूर्याच्या संक्रमणातच घसरली असल्याने गव्हाच्या ओंब्या, हरभऱ्याची घाटे पोषणाच्या अवस्थेत असतांनाच, रब्बीच्या हंगामासाठी पाणी व्यवस्थापन मोडकळीस आल्याने रब्बी हंगामाचा घास भूजलसंकटाच्या घशात अडकला आहे. किंबहुना, रब्बीच्या हंगामाचा ऐन तोंडी आलेला घास निसर्गाचे दृष्टचक्र हाती येवू देते की नाही असे भयानक भूजलाचे संकट गडगडत असल्याने शेतकरीवर्ग कमालीचा हवालदिल झाला आहे.          तालुक्यातील रब्बीच्या हंगामासाठी १० हजार ६०० हेक्टर हरभऱ्याचे, तर साडेचार हजार क्षेत्र गव्हाचे, साडेचार हजार हेक्टर क्षेत्र मक्याचे असून एकूण सुमारे १९ हजार हेक्टरमधील रब्बीच्या हंगामाचा घास भूजलसंकटाच्या घशात अडकला असून, शासनाने व लोकप्रतिनिधींनी तत्संबंधी गंभीर दखल घेऊन तातडीने उद्भवणाऱ्या आपात्कालीन परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी शेतकरीहितासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचा सूर जनमानसातून व्यक्त होत आहे.  कालच, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी सात धरणांचा तालूका अन् समृध्दीचा असलेल्या वारस्याचा धागा पकडत रावेर, यावल व चोपडा तालूके सर्वाधिक भूजल उपसणारे तालूके असल्याने मेगारिचार्ज प्रकल्पाची सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नांनी कार्यपुर्ती न झाल्यास तीघही तालूक्यात वाळवंट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशी वर्तवलेली गंभीर दाहकता शासनाचे लक्ष केंद्रित केले होते. 

टॅग्स :Jalgaonजळगाव