शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जळगावला भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त रविवारी भव्य शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 18:29 IST

विविध कार्यक्रमातील मुख्य सोहळा 9 रोजी होणार असून भगवान महावीर स्वामी जयंतीदिनी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

सकाळी ध्वजवंदन : शोभायात्रा मार्गावर प्रतिष्ठान सजावट स्पर्धाजळगाव : शासनपती श्रमण भगवान महावीर स्वामी यांच्या 2616व्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त सकल जैन श्री संघाच्यावतीने आयोजित विविध कार्यक्रमातील मुख्य सोहळा 9 रोजी होणार असून भगवान महावीर स्वामी जयंतीदिनी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. भगवान महावीर स्वामी यांच्या  जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त विविध स्पर्धा व उपक्रम सुरू आहेत. यामध्ये 9 रोजी जयंतीदिनी सकाळी साडेसहा वाजेपासून विविध ठिकाणी फळ व बिस्कीट वाटप करण्यात येणार आहे.  साडेसात वाजता काँग्रेसभवन समोरील श्री वासुपूज्य जैन मंदिर येथे ध्वज वंदन होणार असून 8 वाजता याच ठिकाणापासून शोभायात्रेला सुरुवात होऊन बालगंधर्व सभागृहाजवळ तिचा समारोप होईल. शोभायात्रा मार्गावर असणा:या प्रतिष्ठानांसाठी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून भगवान महावीर  संदेश बॅनर सजावट स्पर्धादेखील घेण्यात येणार आहे. जैन नवयुवक मंडळाच्यावतीने बालगंधर्व सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता डॉ.  बिपीन दोशी हे मार्गदर्शन करणार असून या वेळी गौतम प्रसादीचे लाभार्थी कणकमल राका यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्य़ाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुरेशदादा जैन हे  राहणार असून माजी खासदार ईश्वरलाल जैन, शाकाहार सदाचारचे प्रणेते रतनलाल बाफना, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर रमेशदादा जैन, कणकमल राका यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सकल जैन श्री संघ व श्री वर्धमान स्थानकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष दलुभाऊ जैन, श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे अध्यक्ष सुगनचंद राका, श्री जैन श्वेतांबर तेरापंथ सभेचे अध्यक्ष मनोज सुराणा, श्री महावीर दिगंबर जिन चैत्यालय ट्रस्टचे अध्यक्ष राजेश जैन यांनी केले आहे. गो मातांना लापसी भोग8 रोजी सकाळी  ट्रेझर हंट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी  9 वाजता पांझरा पोळ येथे गो मातांना लापसी भोग दाखविण्यात आला.  दुपारी 2 ते 5 दरम्यान श्री कच्छी दशा विसा महासंघातर्फे नवकार महामंत्र जाप  करण्यात आला. 10 रोजी प.पू. जैनाचार्य 1008 श्री रामलालजी म.सा. यांच्या 64व्या जन्मोत्सवानिमित्त सागर भवन येथे दुपारी 3 ते 4 दरम्यान नवकार महामंत्र जाप होईल.