Goa Express was on its way, the railway line was broken | गोवा एक्सप्रेस जात असतानाच रेल्वेचा रुळ तुटला, सुदैवाने अनर्थ टळला
गोवा एक्सप्रेस जात असतानाच रेल्वेचा रुळ तुटला, सुदैवाने अनर्थ टळला

जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून निघून पुण्याकडे जात असलेली गोवा एक्सप्रेस रुळावरून जात असतानाच तोच रुळ तुटल्याची घटना गुरुवारी सकाळी घटली. सुदैवाने वेळीच हा प्रकार एका कर्मचाऱ्याच्या व मालगाडीच्या चालकाच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.
हजरत निजामुद्दीनकडून वास्को (गोवा)कडे जाणारी १२७८० ही गोवा एक्सप्रेस गुरुवारी सकाळी चाळीसगाव स्थानकावरून निघाल्यानंतर पुढे एका ठिकाणी रेल्वे रुळ बदलत असतानाच एक रुळ तुटला असल्याचे एका कर्मचाºयाच्या व मालगाडीच्या चालकाच्या लक्षात आले. त्या वेळी त्यांनी सतर्कता दाखवित या विषयी कळविले व रेल्वेगाडी जागीच रोखण्यात आली. मात्र तोपर्यंत रेल्वेचे चार साधारण व चार आरक्षित डबे या तुटलेल्या रुळाच्या भागावरून पुढे गेलेले होते. सुदैवाने कोणताही अनर्थ झाला नाही. घटनेनंतर रुळाची दुरुस्ती करण्यात आली.

Web Title: Goa Express was on its way, the railway line was broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.