शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

या दिलेर दोस्ताला केव्हाही आवाज द्या, खडसेंना काँग्रेसचं आमंत्रण  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 4:22 PM

राज्यात सद्य राजकीय परिस्थितीत नाथाभाऊंसारखा स्वाभिमानी नेता नाही. नाथाभाऊ खडसे खरे 'स्वाभिमानी'... पक्षातून कोणी ढकलून बाहेर काढेपर्यंत त्यांनी वाट पाहू नये.

रावेर - पक्ष सोडण्याचा विचार नाही पण पक्षातील लोक मला पक्षातून ढकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत असे विधान माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावर जळगावात केलं. त्यांच्या विधानावर बोलताना अशोक चव्हाण यांनी त्यांना काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले की, राज्यात सद्य राजकीय परिस्थितीत नाथाभाऊंसारखा स्वाभिमानी नेता नाही. नाथाभाऊ खडसे खरे 'स्वाभिमानी'... पक्षातून कोणी ढकलून बाहेर काढेपर्यंत त्यांनी वाट पाहू नये. या दिलेर दोस्ताला केंव्हाही आवाज द्या आम्ही तुमच्या साथीला आहोत, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी खडसे यांना काँग्रेसमध्ये येण्याचे आवाहन केलं. 

खडसेंच्या उद्वेगाचा परामर्श घेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी यावेळी  सरकारवर हल्ला चढवला.  ते म्हणाले नाथाभाऊ तुम्ही पक्ष ढकलण्याची वाट पाहू नका. आपले फोटो मिश्किलपणे हसतांना उद्या छापून येतील. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत येवू शकतात अशी तोफ डागली. 

एकनाथराव खडसे विरोधी पक्षनेते असताना म्हणायचे सरकारविरुद्ध कलम ३०२ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती. आजही त्यांची या सरकारविरुद्ध ती भुमिका कायम असेल. कारण ते तत्त्वनिष्ठ राजकारणी आहेत असा चिमटाही त्यांनी काढला.

किंबहुना, राज्यात १२ ते १३ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा हसण्यावर नेण्याचा विषय नसला तरी शेतकर्‍यांच्या आत्महत्येसंबंधी सरकार संवेदनशील असले पाहिजे. सरकारकडे निधी नसेलही पण त्या प्रश्नांना हात घालून प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी राज्याचे सरकार सक्षम असले पाहिजे अशीही तोफ त्यांनी डागली. 

एकाच विषयावर १५ ते १६ बदलणारे अध्यादेश न काढता तातडीने निर्णय घेण्याची निर्णयक्षमता सरकारकडे असली पाहिजे. जे बोलतो ते करून दाखवता आले पाहिजे. देशात हे राज्य अग्रेसर असल्याचा नावलौकिक आहे, ती राज्याची प्रतिमा जपण्याची जबाबदारी पाळली पाहिजे अशा कानपिचक्या देत एकनाथराव खडसेंना त्यांनी शुभेच्छा दिल्या. 

यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, खासदार रक्षा खडसे, उत्तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आमदार भाई जगताप, माजी खासदार डॉ गुणवंतराव सरोदे, डॉ उल्हास पाटील व ईश्वरलाल जैन, आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार दत्तात्रय महाजन रमेश चौधरी, अरूण पाटील, उदेसिंग पवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रोहिणी खडसे, जि प उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, आदी मान्यवर उपस्थित होते. 

काय म्हणाले खडसे - 

 ‘आपण पक्ष सोडणार नाही. मात्र पक्ष सोडायला जर तुम्ही मला भाग पाडाल तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही, असा सज्जड इशारा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावर जळगावात भाजपला दिला.  या समारंभात मनोगत व्यक्त करताना माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले,  यांच्या दिवंगत विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी व दिवंगत गृहमंत्री जे टी महाजन यांच्या परस्परविरोधी पॅनलमध्ये निवडणूकीत भुमिका बजावताना काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील यांनी दोन्ही बाजूंनी विजय मिळवून दिल्याचा धागा पकडत राजीव पाटील यांनी डोक्यात पगडी घातली रे घातली की हे वेगळे बदल होतात अशी मल्लिनाथी करत पुणेरी पगडी घातल्याचा हा परिणाम असल्याचा चिमटा काढल्याने एकच हास्यकल्लोळ उडाला.

माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांनी कुण्या व्यक्तीचा द्वेष केला नाही. पण जिल्ह्यात अपप्रवृत्ती फोफावू नये म्हणून खासदार अशोकराव चव्हाण हे नगरविकास मंत्री असताना जळगाव मनपाच्या भ्रष्टाचाराविरूध्द आपण आवाज उठवल्याच्या स्मृतीही त्यांनी जागवल्या. यापुढे आपल्या संघर्षमय राजकीय वाटचालीचा आढावा घेतांना खडसे म्हणाले, आज मला या जुन्या सहकार्यांसोबत बसताना "बैठे है हम कुंजोमे गुन्हेगार बनके.." असे वाटू लागल्याने मी सरकारला, पक्षाला व नेत्यांना जाब विचारतोय की, गेल्या १८ ते २० महिन्यात दाऊदच्या पत्नीशी बोलल्याचे, गैरव्यवहाराचे, भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. मी चोर असेल, उच्चाट असेल, बदमाश असेल, भ्रष्टाचारात नंबर वन असेल. आपण चौकशीही केली.

माझ्याविरुद्ध लाचलुचपतीचे तीन गुन्हे दाखल केले. कोणते पाप केले ते सांगा. मी कुठे दोषी आहे. याचे मला उत्तर हवयं. एकतरी सबळ पुरावा जनतेसमोर आणावा. सरकारकडे वा पक्षाकडे मी एकदाही मंत्री करा अशी एकदाही मागणी केली नाही. त्यासाठी मी आता जनतेसमोर जाणार असल्याचे त्यांनी व्यथित होऊन स्पष्ट केले. 

40 वर्षे पक्ष विस्तारण्यासाठी व वाढवण्यासाठी काम केले. त्यामुळे पक्ष सोडण्याची इच्छा काय मनात विचारही नाही. मात्र तुम्ही मला पक्षाबाहेर ढकलत आहात. गुन्हेगार असेल तर उर्वरित आयुष्य जेलमध्ये जावून घालवायला तयार आहे. पाप केले असेल तर भोगावेच लागेल. पक्ष जर पक्ष सोडायला भाग पाडत असाल तर माझ्यासमोर मात्र दुसरा पर्याय नाही असा गर्भगळित इशाराही त्यांनी दिला. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणEknath Khadaseएकनाथ खडसेBJPभाजपाcongressकाँग्रेस