शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

गिरणा धरणाची सलग दुसऱ्या वर्षी शतकी सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 2:50 PM

1969 मध्ये तयार झालेल्या गिरणा धरणाच्या 51 वर्षांच्या काळात हे धरण दहा वेळा शंभर टक्के भरले आहे.

जळगाव - जळगाव जिल्ह्यातील 175 गावांची तहान भागविणारे गिरणा धरण बुधवारी 100 टक्के भरले असून सलग दुसऱ्या वर्षी गिरणा धरणाने शतकी सलामी दिली आहे. 1969मध्ये तयार झालेल्या गिरणा धरणाच्या 51 वर्षांच्या काळात हे धरण दहा वेळा शंभर टक्के भरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात होत असलेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातील तीनही मोठ्या प्रकल्पात पाणीसाठा वाढून वाघूर धरण यापूर्वीच 4 सप्टेंबर रोजी 100 टक्के भरले आहे. तसेच हतनूर धरणातही पाण्याची आवक सुरूच असल्याने पाणी साठा वाढून दररोज धरणाचे दरवाजे उघडले जात आहे. वाघूर धरण शंभर टक्के भरल्यानंतर आता गिरणा धरणही शंभर टक्के भरल्याने जिल्ह्याचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. 

दरम्यान, गिरणा धरण पूर्ण भरल्याने धरणातून पाणी सोडण्याच्या विचार सुरू होता मात्र आता धरण क्षेत्रात पाऊस थांबल्याने तूर्त धरणाचे दरवाजे न उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील सटाणा व इतर भागात पाऊस झाल्यास व धरणात वाढीव पाणी येऊ लागल्यास धरणाचे दरवाजे केव्हाही उघडावे लागतील अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे अभियंता हेमंत पाटील यांनी दिली. सध्या दरवाजे उघडले नसले तरी नागरिकांनी नदीकाठावर जाऊ नये असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

योगायोग 

गेल्या वर्षी 17 सप्टेंबर 2019 रोजी गिरणा धरण शंभर टक्के भरले होते. त्यानंतर यंदाही 16 सप्टेंबर रोजी हे धरण पूर्ण भरले आहे. 

दृष्टिक्षेपात गिरणा धरण

- स्थळ - नांदगाव पासून वीस किलोमीटर वर - उभारणी - 1969 (1955 मध्ये बांधकामाला सुरुवात व 1969 मध्ये पूर्ण) -साठा - 21, 500 दशलक्ष घनफूट - सध्याची स्थिती - 100 टक्के भरले - जिल्ह्यातील लाभ क्षेत्र - 70 हजार हेक्‍टर -लाभ - जिल्ह्यातील 175 गावे - धरणाची शंभरी - 51 वर्षात 10 वेळा  

गिरणा धरणाची आतापर्यंतची शंभरी 

6 ऑक्टोबर 1973 26 सप्टेंबर 1976 29 सप्टेंबर 1980 11 ऑक्‍टोबर 1994 6 ऑक्टोबर 2004 2 ऑगस्ट 2005 23 सप्टेंबर 2006 15 सप्टेंबर 2007 17 सप्टेंबर 2019 16 सप्टेंबर 2020

टॅग्स :JalgaonजळगावWaterपाणी