जळगावात भरधाव कारने विद्यार्थिनीला उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 18:33 IST2018-08-09T18:32:32+5:302018-08-09T18:33:56+5:30
अयोध्या नगरातून दुचाकीने मू.जे.महाविद्यालयात जात असलेल्या हेमलता कमलाकर अत्तरदे (वय १९, रा.अयोध्या नगर, जळगाव) या विद्यार्थिनीला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली.

जळगावात भरधाव कारने विद्यार्थिनीला उडविले
जळगाव : अयोध्या नगरातून दुचाकीने मू.जे.महाविद्यालयात जात असलेल्या हेमलता कमलाकर अत्तरदे (वय १९, रा.अयोध्या नगर, जळगाव) या विद्यार्थिनीला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली. नशिब बलत्तर म्हणून ती या अपघातातून बचावली, मात्र हाताला दुखापत झाली. हा अपघात होताच चारचाकी चालकाला जमावाने बाहेर काढून बदडले. हा अपघात गुरुवारी सकाळी ९ वाजता नेरी नाका चौकात झाला.
हेमलता ही मू.जे.महाविद्यालयात बारावीच्या वर्गात आहे. गुरुवारी सकाळी महाविद्यालयात जात असताना नेरी नाका चौकात चारचाकीने हेमलता हिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात ती दुचाकीसह कोसळली. त्यामुळे तिच्या दोन्ही हाताला खरचटले. नशिबाने या अपघातातून ती बालंबाल बचावली. अपघाताची माहिती मिळताच हेमलता हिचे वडील कमलाकर अत्तरदे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. मुलीला खासगी दवाखान्यान नेऊन उपचार केले. उपचारानंतर तिची लगेच सुटका करण्यात आल्याची माहिती अत्तरदे यांनी दिली.