जिल्हा दूध संघात निवडून येऊन दाखवाच;गिरीश महाजन यांचे एकनाथ खडसेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 22:57 IST2022-11-27T22:48:40+5:302022-11-27T22:57:50+5:30

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांचे नाव न घेता टोला लगावला.

Girish Mahajan's challenge to Eknath Khadse after being elected to District Milk Sangh | जिल्हा दूध संघात निवडून येऊन दाखवाच;गिरीश महाजन यांचे एकनाथ खडसेंना आव्हान

जिल्हा दूध संघात निवडून येऊन दाखवाच;गिरीश महाजन यांचे एकनाथ खडसेंना आव्हान

मोहन सारस्वत/ लियाकत सय्यद 

जामनेर  जि. जळगाव :  तुमच्याशी माझी तुलना करु नका,  सत्ता असतांना वाटेल ते केले, आम्ही तसे करणार नाही, सत्तेचा उन्माद बरा नाही,  नोटबंदी काळात तुम्ही काय केले, हे सर्व जाणून आहे, असा टोला ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांना त्यांचे नाव न घेता मारला, आणि आता निवडून येऊन दाखवाच, असे आव्हानही दिले.

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा मेळावा रविवारी सायंकाळी जामनेर येथील बाबाजी राघो मंगल कार्यालयात झाला.  त्यावेळी महाजन बोलत होते.

जामनेरचे नगराध्यक्ष पद कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळेच साधना महाजन यांनी स्विकारले.  घरातील एकाही सदस्याला पदापासून तुम्ही दूर ठेवले नाही, गेल्या वेळी दूध संघाचे चेअरमनपद एक वर्षासाठी ठरले होते. पण पद सोडले नाही. निवडणुकीच्या निकालानंतर सर्वांना कळेल, असेही महाजन म्हणाले.  

खडसेंनी वयाची सत्तरी गाठली, त्यांनी बोलतांना सांभाळून बोलले पाहिजे, त्यांच्या बोलण्यात मी पणा आहे असे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. संजय पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. 
 व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, स्मिता वाघ, अरविंद देशमुख, तुकाराम निकम, जे.के.चव्हाण,  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, शिवाजी सोनार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रवींद्र झाल्टे यांनी तर आभार तुकाराम निकम यांनी मानले.

Web Title: Girish Mahajan's challenge to Eknath Khadse after being elected to District Milk Sangh