घरफोडी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला जळगावात अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 22:49 IST2019-04-28T22:48:34+5:302019-04-28T22:49:32+5:30
हद्दपार केलेला आरोपीच निघाला टोळीचा म्होरक्या

घरफोडी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला जळगावात अटक
जळगाव : जळगावातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक भागवत ओंकार अहिरे यांच्याकडे पावणे तीन लाखाची घरफोडी करणाºया चार जणांच्या टोळीला पोलिसांनीअटक केली आहे. शहरातून हद्दपार केलला राहूल नवल काकडे (३०, रा.समता नगर, जळगाव) हाच या टोळीचा म्होरक्या निघाला. त्यांच्याकडून एक लाख ३० हजार रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये काकडेसह बबुल रवींद्र सपकाळे (२६), किरण किशोर गोटे (१९) व बापू भावलाल सोनवणे (२२ सर्व रा.समता नगर, जळगाव) यांचा समावेश आहे. काकडेविरुध्द हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याचा वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चोरीच्या संशयावरुन पोलिसांनी काकडे याला ताब्यात घेतले होते. तोच या चोरीचा सूत्रधार निघाला. ट्रकच्या विम्याची मुदत संपल्याने त्यासाठी भागवत अहिरे यांनी २ लाख रुपये जमविले होेते. त्यावरच चोरट्यांनी डल्ला मारला होता.