स्फूर्ती व उत्साह वाढविणारा गणेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 08:49 PM2018-09-20T20:49:55+5:302018-09-20T20:50:44+5:30

सध्या आपण बाप्पाच्या सोबत आहोत. तसे आपण तब्बल दहा दिवस राहात असूनही आपल्याला किती करू आणि काय करू असे या आवडत्या पाहुण्यासाठी होते.

Ganeshotsav, which enhances inspiration and enthusiasm | स्फूर्ती व उत्साह वाढविणारा गणेशोत्सव

स्फूर्ती व उत्साह वाढविणारा गणेशोत्सव

Next

सध्या आपण बाप्पाच्या सोबत आहोत. तसे आपण तब्बल दहा दिवस राहात असूनही आपल्याला किती करू आणि काय करू असे या आवडत्या पाहुण्यासाठी होते. आपण लहान बालकांसोबत मूर्ती तयार करतो. त्यावेळेस मूर्ती पूर्ण झाल्यावर त्याला रंगवल्यानंतर, त्याचे छायाचित्र काढल्यानंतर त्याला ‘लोकमत’ मध्ये बघितल्यावर मुलांना जो आनंद होतो. बाप्पा त्यानेच खूष होतो ! त्याच्याही चेहऱ्यावर अस्फूट स्मितरेषा सहज दिसू शकते. फुलवाले देहभान विसरून दररोज वेगवेगळी आरास करतात. मंडप सजवणारे तो उंच-उंच नेतात, त्यात रंगबिरंगी कनाती बांधतात आणि बाप्पाचे घर सजवताना आपले घरदार विसरून जातात. ढोल-ताशा, लेझीम यांची पथके असे काही वाजवतात की त्याने देहभान हरपायला होते. त्यांचे तर केव्हाच हरपलेले असते. आरत्या, अथर्वशीर्ष, मंत्रपुष्पांजली हे शिस्तीत आणि आरोह अवरोहांसह जेव्हा घरोघरी आणि मंडळात म्हटले जाते तेव्हा गळ्यावर जे संस्कार होतात ते कायमस्वरूपी टिकणारे असतात.
नवनवीन आकार, प्रकारात उत्पादने, वस्तू याच सणात बाजारात येतात व ते धडाक्याने विकले जातात. नातेवाईक सुटी घेऊन एकमेकांना भेटतात. मोठे मंगलदायक असे सारे वातावरण बाप्पा सोबत घेऊन येतो. घरे सजतात, दारे सजतात आणि बाप्पा मनात रूजतात! फार मोठे कलाभान वाढवणारी ही देवता, म्हणूनच माझी आवडती आहे.
मला आठवते सुमारे ३ वर्षांपूर्वी माझ्याकडे एक बिल्लास आकाराची एक गुळगुळीत पांढरा-शुभ्र कागद असलेली अशी डायरी होती. ती मी ‘कलाभान’ हा शब्द वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक पानावर लिहून संपूर्ण भरून टाकली. एकसारखी अशी त्या शब्दाची कोठेही रचना झाली नाही हा त्या बाप्पाचा प्रसाद होता. आता मला कळते आहे की रेषा हळूहळू मला काढता यायला लागली होती. तिचे भान आले होत, ते मला आधी कधीही नव्हते ! आज बघतो हे आहे की मी उत्तम स्केचिंग करू शकतो !
मला ‘मी-माझे’ असे आत्म-प्रशस्तीपवर आपणास सांगायचे नाहीये. याहूनही मोठे चमत्कार ही बुद्धीदात्री आणि कलाप्रेमी देवता आपल्याकडून करवून घेऊ शकते. आपण तो उत्सव साजरा करायला हवा.
वैयक्तिक, सामूहिक भक्ती त्याची करायला हवी. माझे शहर त्या बाबतीत सुदैवी आहे. एक देशभक्तीचे कवन आहे.‘घडो देशसेवा ऐसी, बुद्धी दे अनंता - देश हिच माता...’ मी आपणास विनंती करतो की, बाप्पा आपले कलाभान वाढवो. ‘घडो देशसेवा ऐसी, बुद्धी दे अनंता !’
-प्रदीप रस्से

Web Title: Ganeshotsav, which enhances inspiration and enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.