जिवंतपणीच अंत्ययात्रा ! कशासाठी; पावसासाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 10:25 IST2021-07-31T10:20:25+5:302021-07-31T10:25:07+5:30
जुलै महिना संपला तरी तालुक्यात पावसाने दडी मारल्याने व्यथित झालेल्या गांधली गावकऱ्यांनी निसर्गावर व परमेश्वरावर श्रद्धा ठेवून पावसाला साकडे घालण्यासाठी चक्क जिवंत माणसाची प्रेतयात्रा काढली.

जिवंतपणीच अंत्ययात्रा ! कशासाठी; पावसासाठी
अमळनेर (जि. जळगाव) : जुलै महिना संपला तरी तालुक्यात पावसाने दडी मारल्याने व्यथित झालेल्या गांधली गावकऱ्यांनी निसर्गावर व परमेश्वरावर श्रद्धा ठेवून पावसाला साकडे घालण्यासाठी चक्क जिवंत माणसाची प्रेतयात्रा काढली.
गेल्यावर्षी जुलैअखेर तालुक्यात सरासरी ४६९.३६ मिमी पाऊस पडला होता. यंदा मात्र फक्त ११०.०५ मि.मी. पाऊस पडला आहे.
सरासरीच्या २५ टक्केदेखील पाऊस न पडल्याने उत्पन्न हातचे जाण्याची वेळ आली आहे. दररोज ढगाळ वातावरण दिसते; परंतु एक थेंबही पाऊस पडत नाही म्हणून शेतकरी चिंतेत आहे.