शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

फेसबुकवर मैत्री अन् प्रेम...प्रत्यक्ष भेटूनही राहिले दोघांचे स्वप्न अधुरे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 12:54 PM

प्रेम : जळगावचा तरुण आणि कोलकाता येथील तरुणीची अधुरी एक कहाणी

जळगाव : फेसबुकवर ओळख झाली नंतर मैत्री झाली, या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.. पुढे जावून एकत्र संसार व लग्नाच्या आणाभाका घेतल्या...त्यासाठी दोघांनी घर सोडले.. प्रत्यक्ष भेट झाली... मात्र त्यांचे हे स्वप्न क्षणीक राहिले... प्रेमाची कहाणी देखील अधुरीच राहिली... तरुण जळगावला तर तरुणी कोलकाता येथे परतली.या प्रेम कहाणीची सध्या शहरात चर्चा सुरु आहे. रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा २१ वर्षाचा सागर (काल्पनिक नाव) हा प्लंबरचे काम करतो. कापड व्यवसाय करण्याचा त्याने निर्णय घेतला होता. दोन वर्षापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून कोलकाता येथील १९ वर्षीय जयाच्या संपर्कात आला. दोघांची चांगली ओळख झाली. त्यातून दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली व या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांचे प्रेमप्रकरण इतके बहरले की, भेटीची उत्सुकता लागली. सागर जळगाव तर जया कोलकाता येथे असल्याने सहज भेटणे शक्य नव्हते. मध्यंतरी एका उत्सवाच्यावेळी भेटीचा दिवस निश्चित केला, परंतु जयाला घरुन बाहेर निघायला कुटुंबाकडून अडचणी आल्या, त्यामुळे तेव्हा भेट होऊ शकली नाही.अजमेरला आले दोघं एकत्रपहिली भेट फिस्कटल्यानंतर सागर कपडे घेण्याच्या नावाखाली ५ आॅक्टोबरला सुरतला गेला. जाण्याआधी त्याने भावाला माहिती दिली. यावेळी सागर व जया फेसबुक कॉलिंग व फोनवर संपर्कात आले होते. तेव्हा सागर याने मी सुरत येथे असल्याचे जयाला सांगितले. त्यावर जया याने तू इतक्या जवळ आलाच आहे, तर अजमेरला (राजस्थान) ये मी पण तेथे येते असे सांगितले, त्यानुसार दोघांनी नियोजन केले आणि ६ आॅक्टोबरला सायंकाळी रेल्वेने अजमेरला पोहचले. दोघाना भेटून प्रचंड आनंद झाला. तेथून दोघांनी प्रार्थनास्थळावर जावून दर्शन घेतले. त्यानंतर एका हॉटेलवर दोघांनी मुक्काम केला. तेथे दोघांनी लग्न करण्याचा निश्चय केला. जया हिने कोलकाता येथे घरी जावू. माझ्या आई, वडीलांना भेटू ते लग्नाला होकार देतील असे सांगितले,अजमेर येथून दोघे जण ९ आॅक्टोबर रोजी कोलकाता येथे गेले.पोलिसात हरविल्याची नोंददुसरीकडे सागर परत का येत नाही, संपर्क होत नसल्याने कुटुंबाची चिंता वाढली होती. त्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून हरविल्याची तक्रार दिली. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी तपासासाठी सहायक फौजदार गोपाळ चौधरी व भूषण पाटील यांची नियुक्ती केली. प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे आले.पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्याशी चर्चा करुन या तपासासाठी हवालदार विजय पाटील व नरेंद्र वारुळे या दोघांना रामानंद नगर पोलिसांच्या मदतीला दिले. संयुक्त पथकाने केलेल्या तपासात सागर हा कोलकाता येथे असल्याचे निष्पन्न झाले, त्यानुसार पथकाने तेथून सागरला ताब्यात घेतले.असा झाला प्रेम भंग आणि शेवट....कोलकाता येथे गेल्यावर जया याने सागरला एक दिवस हॉटेलवरच मुक्काम करायला लावला. दुसऱ्या दिवशी जया सागरला घेऊन मावशीकडे गेली. मावशीला लग्नाची कल्पना देण्यात आली. आई, वडीलांना राजी करते सांगून जया हिने काही दिवस सागरला मावशीकडेच थांबायला सांगितले. कुटुंबाचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत असतानाच या मावशीकडे पोलिसांचे पथक धडकले. त्यावेळी जयालाही बोलावण्यात आले. जया कुटुंबाचा होकार मिळविण्यात त्या काळात अपयशी ठरली तर दुसरीकडे सागरला घ्यायला पोलीस आल्याने दोघंही संकटात सापडले. शेवटी दोघांनी भविष्याचा विचार केला, कुटुंबावर बेतणारा प्रसंग, समाजात होणारी बदनामी, पालकांचा विश्वासघात, त्यांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट या साºया गोष्टीची दोघांना जाणीव झाली आणि झालं गेलं विसरुन दोघंही आपआपल्या घरी परतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव