...मी तर एकनाथ शिंदेंचा पीए; वेटरला द्यायचा एक हजाराची टीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 11:52 IST2025-08-10T11:52:28+5:302025-08-10T11:52:28+5:30

वेटरला ५०० ते एक हजार रुपयांची टिप देऊन आपण उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी तो करायचा.

Fraudster claiming to be Eknath Shinde personal assistant | ...मी तर एकनाथ शिंदेंचा पीए; वेटरला द्यायचा एक हजाराची टीप

...मी तर एकनाथ शिंदेंचा पीए; वेटरला द्यायचा एक हजाराची टीप

जळगाव : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत फसवणूक करणारा हितेश रमेश संघवी (४९) हा हॉटेलमध्ये थांबून त्याने अनेकांना गळाला लावले. वेटरला ५०० ते एक हजार रुपयांची टिप देऊन आपण उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी तो करायचा. शिंदे यांच्या कार्यालयात स्वीय सहायक असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवून हितेश संघवी व त्याची पत्नी अर्पिता यांनी १८ जणांची ५५ लाख ६० हजारची फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Fraudster claiming to be Eknath Shinde personal assistant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.