शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या योजनेत ४७ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST

फोटो लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीअंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान या ...

फोटो

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीअंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान या योजनेत ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दीपक नीळकंठ जावळे (२७, रा.नितीन साहित्यानगर, सुप्रीम कॉलनी) याला मंगळवारी अटक केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीअंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य उद्योजक विकास अभियानांतर्गत शैक्षणिक संस्था सुरू करून देण्यासाठी भूषण गणेश बक्षे (वय २७, रा.पार्वती काळेनगर, मोहाडी रोड, जळगाव) याने भारती गजेंद्रसिंग परदेशी (रा.रायपूर, ता.जळगाव) यांच्याकडून आवश्यक ते कागदपत्र घेतले व संस्थेची नोंदणी केली. या प्रशिक्षण संस्थेला मिळणारे ४७ लाखांचे शासकीय अनुदान परस्पर लाटून घेतले होते, अशा आशयाची तक्रार भारती परदेशी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार, १ फेब्रुवारी, २०१९ रोजी भूषण गणेश बक्षे, शीतल भगवान पाटील, भरत अरविंद भंगाळे, मोहिनी भरत भंगाळे, राजेंद्र नरेंद्र नारखेडे व भगवान दगडू पाटील या सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. यापैकी भूषण व शीतल या दोघांना अटक झाली होती, तर उर्वरित चौघांना औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. दरम्यान, या गुन्ह्याची चौकशी करताना दीपक जावळे हाच संस्थेचे मुख्य व्यवहार हाताळत होता. सर्व महत्त्वाचे दस्तऐवज त्याच्या ताब्यात होते. त्यामुळे तपास अधिकारी संदीप पाटील यांनी जावळे याला या गुन्ह्यात आरोपी केले होते. या गुन्ह्यात प्रशिक्षण केंद्र चालविणाऱ्या, तसेच प्रशिक्षण केंद्रासाठी अर्ज केलेल्या काही महिला व पुरुषांची चौकशी करण्यात आली असून, त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आलेले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यापासून जावळे फरार होता. मंगळवारी त्याला अटक करण्यात आली.

गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग

दरम्यान, मोठा आर्थिक व्यवहार असल्याने, हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या गुन्ह्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक संदीप पाटील यांचीही याच शाखेत योगायोगाने बदली झाली. त्यामुळे हा तपास त्यांच्याकडे सोपविण्यात आला. या गुन्ह्याची व्याप्ती अडीच कोटी रुपयांच्या घरात असून जळगाव शहराच्या बाहेरील प्रशिक्षण केंद्रेही चौकशीच्या फेऱ्यात असल्याचे पाटील यांनी सांगितले.