भोकरबारी धरणात चारशे लिटर गावठी दारू नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 22:10 IST2021-04-20T22:09:36+5:302021-04-20T22:10:19+5:30
पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ गावठी दारूची भट्टीवर पोलिसांनी धाड टाकली

भोकरबारी धरणात चारशे लिटर गावठी दारू नष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ गावठी दारूची भट्टीवर पोलिसांनी धाड टाकली असता अठरा हजार रुपयाची चारशे लिटर गावठी दारू पकडून नष्ट केली.
दि. २० रोजी दुपारच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, विजय भाई, नरेंद्र गजरे, राहुल पाटील, दीपक आहिरे, हेमचंद्र साबे यांनी वंजारी शिवारातील भोकरबारी धरणाजवळ आज प्रवीण लालचंद मोरे हा इसम गावठी दारूची भट्टी लावत होता.
गूळ व नवसागर चे रसायन मिश्र करून तयार करत होता. पोलिसांनी धाड टाकली असता सुमारे अठरा हजार रुपयाची चारशे लिटर गावठी दारू पकडली व नष्ट केली. याबाबत पो. कॉ. राहुल नारायण पाटील यांनी फिर्यादीवरून पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.