माजी आमदार दत्तात्रय महाजन यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 23:37 IST2021-03-30T23:37:13+5:302021-03-30T23:37:44+5:30
जामनेरचे माजी आमदार दत्तात्रय उघडू महाजन (८४) यांचे मंगळवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.

माजी आमदार दत्तात्रय महाजन यांचे निधन
ठळक मुद्देमंगळवारी सायंकाळी घेतला अखेरचा श्वास
लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : माजी आमदार दत्तात्रय उघडू महाजन (८४) यांचे मंगळवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.
१९९० ते १९९५ या कालावधीत ते आमदार होते. तत्पूर्वी १९८५ ते ९० त्यांनी जामनेर ग्रामपंचायतीचे सरपंचपद भुषवले होते. माजी खासदार ईश्वरलाल जैन यांचे ते निकटचे सहकारी होते. इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संस्थेचे ते संस्थापक होते. दत्तात्रय महाजन पतपेढी, श्रीकृष्ण दुध डेअरी, जामनेर फ्रूट सेल सोसायटी आदी संस्थांमध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. जामनेर तालुका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते.
पश्चात पत्नी, सून, मुली,जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.