शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

चाराअभावी दुग्ध व्यवसाय अडचणीत

By admin | Updated: January 4, 2017 00:17 IST

बळसाणे : कमी पावसामुळे यावर्षी बळसाणे व परिसराची खरीप हंगामाने निराशा केल्याने उन्हाळ्यात चारा समस्या जाणवणार आहे.

बळसाणे : कमी पावसामुळे यावर्षी बळसाणे व परिसराची खरीप हंगामाने निराशा केल्याने उन्हाळ्यात चारा समस्या जाणवणार आहे. या परिसरात  चाºयाचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. परजिल्ह्यातून कोरडा चारा आणून जनावरे जगवली जात आहे. या कारणाने दुग्ध व्यवसायावर परिणाम जाणवायला लागला आहे.दुग्ध व्यवसाय टिकविण्यासाठी परजिल्ह्यातून चारा आणला जात आहे. चाºयाच्या अभावाने दुभती जनावरे व पशुधन कमी होण्याच्या मार्गावर आहे. दुसरीकडे विक्रीच्या चाºयामुळे दुधाळ म्हशींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पावसाळ्यात पाळीव प्राणी सहज पोसले जातात. परंतु उन्हाळ्यात त्यांना पोसणे अवघड होते. त्यामुळे नागरिकांना गायी, म्हशींचे दूध मिळणे कठीण झाले आहे. अल्प पावसामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. विकतचा चारा, महागडे पशुखाद्य, वैद्यकीय उपचारासह अन्य कारणांमुळे भाकड जनावरे,  औताचे बैल व दुभती जनावरे अशा परिस्थितीत सांभाळ करणे कठीण झाले आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दुभती जनावरे कशीबशी पोसली जात आहेत. सध्या गायी, म्हशींच्या दुधाला फॅट लावला जातो. म्हशीचे दूध घरगुती वापरासाठी विकले जाते व गायीचे दूध डेअरीवर जाते. दुग्ध व्यवसायात जनावरांना लागणारा चारा हाच प्रमुख घटक असून त्याचीच परिसरात कमतरता निर्माण झाली आहे. परिसरात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. शेतकºयाला दुधाच्या उत्पादनाबरोबर गुरांपासून शेणखतही मिळते. पावसाळ्यात चाºयाची चिंता नसली तरी उन्हाळ्याकरिता नातेवाइकांकडे चाºयाची शोधाशोध सुरू असल्याचे येथील शेतकरी सरदार पाटील यांनी सांगितले. खरीप पिकाचा कोरडा चारा पूर्ण उन्हाळ्यात कामात येतो. परंतु अल्प पावसाने खरीप हंगामात पिकांपासून कमी चारा निर्माण झाला, असे जाणकार शेतकºयांचे म्हणणे आहे . बळसाणे व परिसरातील विहिरींची पाणी पातळीही कमी होत असल्याचे सांगितले जात असून चाºयाच्या समस्येमुळे दुभती गुरे विकावी लागत असल्याचेही सांगण्यात आले.  जनावरांना हिरवा चारा मिळत नाही. चाºयाच्या शोधासाठी भटकंती करावी लागत आहे.  जनावरांचे मुख्य खाद्य म्हणजे ढेप आहे. पण दिवसेंदिवस ढेपचे दर सरासरी १२०० ते १३०० रु.पर्यंत गेल्याने दुग्ध व्यवसाय करणे परवडत नाही. गावात दुधाचा ४५ ते ५० रुपयापर्यंत भाव आहे. दिवसाला एक गोणी ढेप लागते. त्यामुळे खर्च होणाºया पैशांच्या तुलनेत हातात काहीच पडत नाही..- नारायण धनुरे, दूध विक्रेता