शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांनी मिळाला वृद्ध मातेस खावटीचा न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:17 IST

रावेर : शहरातील एका ७५ वर्षीय वृद्ध मातेला तिघेही मुले सांभाळत नसल्याने त्यांच्याकडून खावटी मिळवण्यासाठी तब्बल पाच वर्षे ...

रावेर : शहरातील एका ७५ वर्षीय वृद्ध मातेला तिघेही मुले सांभाळत नसल्याने त्यांच्याकडून खावटी मिळवण्यासाठी तब्बल पाच वर्षे रावेर न्यायालयाचे खेटे मारल्यानंतर लोकन्यायालयात न्याय मिळाला आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रहिवासी मथुराबाई नामदेव चौधरी (७५) यांनी रावेर न्यायालयात मुरलीधर नामदेव चौधरी अशा तिन्ही मुलांविरुद्ध रावेर न्यायालयात गत पाच वर्षांपासून खावटीचा दावा दाखल केला होता. तथापि, शनिवारी लोकन्यायालयात दिवाणी न्यायाधीश अनंत बाजड, वकील ॲड. व्ही. पी. महाजन, पॅनल पंच सदस्य पत्रकार राजेंद्र अटकाळे व ॲड. मेघनाथ चौधरी तथा ॲड. रमाकांत महाजन यांनी तिघाही मुलांचे मनोमिलन घडवून आणल्याने ७५ वर्षीय वृद्ध मातेला न्याय मिळाला. त्या अनुषंगाने या माता व पुत्रांचा न्या. अनंत बाजड व ॲड. व्ही. पी. महाजन यांच्या हस्ते सत्कार केला.

दरम्यान, या लोकन्यायालयात दिवाणी न्यायाधीश न्या. अनंत एच. बाजड, सहदिवाणी न्यायाधीश आर. एम. लोळगे यांचे दोन पॅनल ठेवण्यात आले होते. रावेर न्यायालयातील एकूण ठेवण्यात आलेले ३०० प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण ५८ खटल्यांचा निपटारा करण्यात आला. त्यातील एकूण रक्कम रुपये ७ लाख दोन हजार ५९९ रुपये वसूल केले. तसेच ग्रामपंचायतीचे, महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे, भारत दूरसंचार निगमचे, रावेर नगरपालिकेचे व बँकेचे ठेवण्यात आलेले दाखलपूर्व एकूण एक हजार ३७ प्रकरणांपैकी १०६ प्रकरणे निकाली काढण्यात आले. त्यातून तडजोड रक्कम ३८ लाख दोन हजार ४४५ रुपये वसूल करण्यात आले. पॅनल १ चे पंच सदस्य म्हणून ॲड. मेघनाथ चौधरी व राजेंद्र अटकाळे, पॅनल नंबर २चे पंच सदस्य म्हणून ॲड. समीर तडवी व आशिष जहुरे यांनी काम पाहिले.

या लोकअदालतीला रावेर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. जगदीश महाजन व न्यायलयीन कर्मचारी ए. एम. सुगंधीवाले, उपाध्यक्ष ॲड. एस. बी. सांगळे, सचिव ॲड. धनराज इ. पाटील, ॲड. व्ही. पी. महाजन, ॲड. आर. एन. चौधरी, ॲड. बी. डी. निळे, ॲड. प्रमोद विचवे, ॲड. डी. डी. ठाकूर, ॲड. तुषार चौधरी, ॲड. रमाकांत महाजन, ॲड. के. बी. खान, राकेश पाटील, ॲड. प्रवीण पाचपोहे, ॲड. योगेश गजरे, ॲड. धुंदले, ॲड. मुख्तार शेख, ॲड. जे. जी. पाटील, ॲड. मुजाहिद शेख, ॲड. सलीम जामलकर, ॲड. अमोल कोंगे, ॲड. सतीश वाघोदे, ॲड. समीर तडवी आदी वकील मंडळी उपस्थित होते. एम.जे. शिंपी, के. आर. वाणी, एस. आर. तडवी, व्ही. डी. मोरे, डी. व्ही. राखुंडे, भरत एस. बारी, डी. एस. डिवरे, के. बी. माने, विश्वनाथ चौधरी, देवचंद आर. जावळे, एन. एम. पाटील, सतीश रावते, के. एस. पाटील, विशाल नाथजोगी यांनी सहकार्य केले.