मोहाडीच्या गावकऱ्यांनी दिले शाळेला पाच टीव्ही संच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 17:00 IST2018-09-28T16:54:18+5:302018-09-28T17:00:55+5:30

जामनेर : तालुक्यातील मोहाडी गावातील व्यवसाय व शिक्षणानिमित्त बाहेरगांवी गेलेल्या गावक-यांनी गावातील शाळा डिजिटल शाळा व्हावी. यासाठी पाच टी.व्ही संच उपलब्ध करुन देऊन इतर गावातील गावक-यांसाठी नवा आदर्श निर्माण केला आहे

Five TV sets for the school given by Mohanadi villagers | मोहाडीच्या गावकऱ्यांनी दिले शाळेला पाच टीव्ही संच

मोहाडीच्या गावकऱ्यांनी दिले शाळेला पाच टीव्ही संच

ठळक मुद्देनोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेल्यांचा आदर्शजिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात केली ग्रामस्थांसोबत चर्चामोहाडी गावातील शिक्षकांची जबाबदारी वाढली

जामनेर : तालुक्यातील मोहाडी गावातील व्यवसाय व शिक्षणानिमित्त बाहेरगांवी गेलेल्या गावक-यांनी गावातील शाळा डिजिटल शाळा व्हावी. यासाठी पाच टी.व्ही संच उपलब्ध करुन देऊन इतर गावातील गावक-यांसाठी नवा आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी निंबाळकर यांनी मोहाडी गावातील ग्रामस्थांशी औपचारिक चर्चा करतांना गावातील प्रलंबित प्रश्नही जाणून घेतले. मोहाडी गावातील शिक्षकांची जबाबदारी आता वाढली असून शिक्षकांनी गावात चांगले विद्यार्थी व नागरीक घडवावेत अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
यावेळी जामनेरचे तहसिलदार नामदेव टिळेकर, मुख्याध्यापक प्रकाश कुमावत, ग्रामस्थ मनोहर पाटील, एस.टी.पाटील, देविदास बागुल, सिताराम साळुंके, मंगेश राजपूत, किरण पाटील, जय प्रकाश पाटील, राजपूत आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहाडी गावातील ग्रामस्थांनी आगळावेगळा कार्यक्रम करुन लोकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. जग २१ व्या शतकाकडे जात असतांना मोहाडी गावांतील शाळा पूर्णपणे डिजीटल व्हावी. जेणेकरून गावातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा विचार करुन गावक-यांनी जबाबदारी स्विकारुन गावातील शाळा पूर्णपणे डिजीटल केल्यामुळे जिल्हाधिकाºयांनी गावक-यांचे अभिनंदन केले.
 

Web Title: Five TV sets for the school given by Mohanadi villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.