शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

जिल्हाभरातील पाचशे आशा सेविका, गटप्रवर्तकांचा जि़.प.ला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 8:36 PM

रास्ता रोको आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ: डीएचओंनी चौकात येऊन दिले आश्वासन

जळगाव : १८ हजार रूपये वेतनासह विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील सुमारे पाचशे आशा व गटप्रवर्तकांनी आयटक संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला घेराव म्हणून चौकात रास्ता रोको आंदोलन केले़ तासाभराच्या या आंदोलनात जिल्हा परिषदेत जाणाऱ्यांना रोखण्यात येत असल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली़ अखेर जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप पोटोडे व पोलीस प्रशासनाने आंदोलस्थळी मुख्य चौकात येऊन आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़दुपारी दोन वाजेच्या सुमारास महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना आयटकच्या माध्यमातून कॉ़ अमृतराव महाजन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेकडे येणारी व जिल्हा परिषदेकडून गावात जाणारी वाहतूक पूर्णत: ठप्प होती़ पुलाचे काम सुरू असलेल्या मुख्य चौकात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ या ठिकाणी आशा सेविकांनी चारही बाजूने मोठे रिंगण करून मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली़ यावेळी सुलोचना साबळे, मिनाक्षी सोनवणे, मनिषा पाटील, भारती चौधरी, संगिता सातपुते, आशा मंडळे, कुसूम गोळे, जयश्री सूर्यवंशी, सुनीता ठाकरे, सुरेखा साळुंके जयश्री अत्तरदे, छाया मोरे, वंदना सोनार, शारदा महाजन, प्रतिभा नेरकर, मनिषा सूर्यवंशी आदींसह जिल्हाभरातील आशा सेविका व गट प्रवर्तक उपस्थित होत्या़तर १८ रोजी जेलभरोगटप्रवर्तकांना बारा वर्षात मानधनवाढ मिळालेली नाही. वारंवार आश्वासने दिली गेली मात्र त्यांची अंमलबजावणी झाली नाही, आशा सेविका यांना १८ हजार तर गटप्रवर्तकांना २५ हजार मानधन द्यावे, केंद्र सरकारच्या पेंशन योजनेत समाविष्ट करावे, आरोग्य खात्याची वेतन श्रेणी लागू करावी, एकछत्री योजना कार्यान्वीत करावी, रिक्त जागा त्वरित भराव्यात यासह विविध मागण्या करण्यात आल्या़ मागण्या मान्य न झाल्यास १८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे़

 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव