कोरोना काळात प्रथमच अनारक्षित तिकिटावर प्रवास शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 23:42 IST2021-03-06T23:41:55+5:302021-03-06T23:42:32+5:30
प्रवाशांना कोरोना काळामध्ये प्रथमच भुसावळ-सुरत, भुसावळ-नंदूरबार या पश्चिम मार्गावर अनारक्षित तिकीटावर प्रवास करता येणार आहे.

कोरोना काळात प्रथमच अनारक्षित तिकिटावर प्रवास शक्य
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : प्रवाशांना कोरोना काळामध्ये प्रथमच भुसावळ-सुरत, भुसावळ-नंदूरबार या पश्चिम मार्गावर अनारक्षित अर्थातच जनरल तिकीटावर प्रवास करता येणार आहे. रेल्वे प्रशासनाने आरक्षित विशेष गाड्या अनारक्षित विशेष गाड्या म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेली भुसावळ-सूरत आणि भुसावळ-नंदुरबार विशेष रेल्वे पूर्णपणे आरक्षित विशेष गाडी चे परिचालन सुरु करण्यात आले होते, मध्य रेल प्रशासन द्वारा यात्री सुविधे करिता पुढील सूचना मिळेपर्यंत आरक्षित विशेष गाडी च्या ऐवजी अनारक्षित विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गाडी क्रमांक - ०९०६७/०९०७८ अप- डाऊन भुसावळ-सूरत आणि गाडी क्रमांक -०९००७/०९००८ अप डाऊन भुसावळ-नंदुरबार , ज्यामध्ये केवळ सामान्य श्रेणीचे डबे अनारक्षित मानले जातील. गाडी क्रमांक-०९०७७/०९०७८ भुसावळ ते सुरत करीता मेल एक्सप्रेस चे भाडे आकारले जातील. गाडी क्रमांक - ०९००७/०९००८ भुसावळ -नंदरबार करीता पॅसेंजरचे भाडे लागू राहील.
गाडी क्रमांक-०९०७७/०९०७८ अप/डाउन भुसावळ-सूरत व गाडी क्रमांक - ०९००७/०९००८ अप/डाउन भुसावल-नंदुरबार मध्ये स्लीपर क्लासचे ३ कोच आरक्षित असतील व उर्वरित कोच अनारक्षित असतील. सध्या या गाड्यांसाठीच अनारक्षित तिकिटे दिली जातील. या गाड्या वगळता इतर कोणत्याही गाड्यांसाठी अनारक्षित तिकिटे दिली जाणार नाहीत.
प्रवाशांनी नेहमीच सामाजिक अंतर सुनिश्चित केले पाहिजे. मास्क घालावे आणि कोविड - १९ च्या निर्धारित प्रोटोकॉलचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.