वारंवार सूचना देऊनही गैरहजर राहणाऱ्या शासकीय रुग्णालयातील दोन डॉक्टर्सवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 23:15 IST2020-06-08T23:14:50+5:302020-06-08T23:15:32+5:30
दोन्ही डॉक्टर कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून गैरहजर होते. वारंवार सूचना देऊनही ते हजर न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारंवार सूचना देऊनही गैरहजर राहणाऱ्या शासकीय रुग्णालयातील दोन डॉक्टर्सवर गुन्हा
जळगाव : कोविडसारख्या महामारीतही वारंवार सूचना देऊनही गैरहजर राहणारे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वरिष्ठ निवासी डॉ़ सचिन रवींद्र सरोदे व सहाय्यक प्राध्यापक डॉ़ रोहन अशोक पाटील या दोन डॉक्टरांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षक मन्साराम महाले यांच्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हे दोन्ही डॉक्टर कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून गैरहजर होते. वारंवार सूचना देऊनही ते हजर न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.