शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

दहा कर्मचार्‍यांना मनपाकडून फुकटचा पगार

By admin | Updated: July 1, 2014 14:52 IST

मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील हातपंप दुरुस्तीसाठी नेमलेले दहा कर्मचारी साहित्याअभावी काम बंद असल्याने गेल्या तीन वर्षांपासून अक्षरश: फुकटचा पगार घेत आहेत.

 

जळगाव : मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील हातपंप दुरुस्तीसाठी नेमलेले दहा कर्मचारी साहित्याअभावी काम बंद असल्याने गेल्या तीन वर्षांपासून अक्षरश: फुकटचा पगार घेत आहेत. सागरपार्कवरील कार्यालय सकाळी तास-दीड तास उघडून नंतर हे कर्मचारी गायब होत असल्याचे चित्र आहे. मात्र पाणीपुरवठा अभियंत्यांचाच आशीर्वाद असल्याने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. 
३ वर्षांपासून निविदाच नाही
मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने हातपंप दुरुस्तीसाठी साहित्य खरेदी करण्याकरिता गेल्या ३ वर्षांपासून निविदाच मागविलेली नाही. त्यामुळे हात पंप दुरुस्तीसाठी साहित्यच उपलब्ध नाही. त्यामुळे साहित्य उपलब्ध असतानाही कामाकडे दुर्लक्ष करणार्‍या कर्मचार्‍यांची साहित्य नसल्याने चंगळ झाली आहे. केवळ मनपा स्तरावर किरकोळ दुरुस्तीचे काम केले जात आहे. 
दीड-दोन तास उघडते कार्यालय
सागरपार्कवर विद्युत व हातपंप दुरुस्ती विभागाचे कार्यालय आहे. सकाळी दीड-दोन तास हे कार्यालय उघडते. या विभागात मूळ क्लोरीन ऑपरेटर म्हणून नियुक्ती असलेले भांडारकर हे प्रमुख आहेत. तसेच अन्य ८-९ कर्मचारी आहेत. मात्र साहित्य नसल्याने कामच नाही. त्यामुळे नंतर हे कर्मचारी सोयीने घरी निघून जात असल्याचे समजते.
३ वेळा केली बदली रद्द
मूळ क्लोरीन ऑपरेटर म्हणून नियुक्ती असलेले भांडारकर यांची जलशुद्धीकरण केंद्रावर तीन वेळा बदली करण्यात आली व तीनही वेळा त्यांनी ती रद्द करून घेतल्याचे समजते. त्यामुळे उपायुक्त गांगोडे यांनी त्यांच्या टिपणीत दरवेळा बदली रद्द करून घेत असल्याचा शेराही मारला असल्याचे समजते. १८५ विद्युतपंपही गायब
मनपा पाणीपुरवठा विभागाच्या रेकॉर्डनुसार शहरात तब्बल २४५ बोअरिंगवर विद्युतपंप बसविण्यात आले होते. मात्र आज त्यापैकी केवळ ६0 पंप शिल्लक आहेत. उर्वरित १८५ विद्युत पंप गायब झाले आहेत. त्यापैकी काही जमिनीत दाबले गेले असे मान्य केले तरीही अन्य पंपांचे काय? असा सवाल उपस्थित होतो. मात्र प्रत्यक्षात या पंपांची सोयीस्करपणे विल्हेवाट लावली गेली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मनपाचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.