शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिकला पर्याय शोधा, नंतर बंदी घाला - कैलाश मुरारका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 13:04 IST

प्लॅस्टिकपासून इंधन निर्मितीसह रस्ते बांधणीलाही होऊ शकतो उपयोग

विजयकुमार सैतवालजळगाव : प्लॅस्टिक निर्मूलनाचे योग्य नियोजन केले तर ते घातक ठरू शकत नाही. उलट प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती होण्यासह रस्ते बांधणीतही त्याचा उपयोग होऊ शकतो. प्लॅस्टिक हे बहुउपयोगी असून त्यावर बंदी घालायचीच असल्यास त्यापूर्वी त्याला किमान पर्याय तरी सूचविला पाहिजे व त्यानंतर त्यावर बंदी घातली पाहिजे, असे स्पष्ट मत आॅल इंडिया प्लॅस्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे मुंबई येथे होणाऱ्या ‘प्लास्टीव्हीजन इंडिया २०२०’ प्रदर्शन आयोजन समितीचे अध्यक्ष कैलाश मुरारका यांनी व्यक्त केले.‘प्लास्टीव्हीजन इंडिया २०२०’ या प्रदर्शनाविषयी माहिती देण्यासाठी मुरारका हे जळगावात आले होते, त्या वेळी त्यांच्याशी चर्चा केली. त्या प्रसंगी त्यांच्याशी झालेला हा संवाद....प्रश्न - प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाबद्दल प्लॅस्टिक उद्योगाची काय भूमिका राहणार?उत्तर - गेल्या वीस वर्षात प्लॅस्टिकच्या वापरात अत्यंत वेगाने वाढ झाल्याने प्लॅस्टिक विरोधात अचानक वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. प्लॅस्टिक बंदीबाबत केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र प्लॅस्टिक घातक नसून त्याच्या वापराच्या सवयी चुकीच्या आहे. आज सर्वच क्षेत्रात, सर्वच ठिकाणी प्लॅस्टिक उपयोगी पडत आहे. त्याचा उपयोग करून त्याची योग्य विल्हेवाट लावली तर ते घातक ठरूच शकत नाही. तरीही ते बंद करायचे असल्यास त्यास योग्य पर्याय शोधला पाहिजे.प्रश्न - कागदी वस्तूंचा पर्याय योग्य ठरू शकतो का?उत्तर - प्लॅस्टिकपेक्षा कागद निर्मितीला जास्त खर्च येतो. सोबतच त्यासाठी जास्त वृक्षांची तोड होऊन ते पर्यावरणास घातक ठरणारे आहे व त्यातून प्रदूषणही अधिक वाढते. त्यामुळे याचा विचार केला तर प्लॅस्टिक घातक नाही.प्रश्न - प्लॅस्टिक नष्ट होत नसल्याने ते पर्यावरणास बाधा ठरते, त्यावर काही पर्याय ?उत्तर - प्लॅस्टिक हे बहुउपयोगी आहे. त्याच्या वापरानंतर त्यापासून इंधन निर्मिती होऊ शकते. इतकेच नव्हे तर रस्ते बांधणीला तो एक चांगला पर्याय आहे.मंदीची चिंता न करता ती एक संधी मानली पाहिजे. उद्योगात गुंतवणुकीची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे याचा सर्वांना लाभ घेतला पाहिजे. प्लॅस्टिकचा वापर प्रत्येकाने काळजीपूर्वक केला व त्याची योग्य विल्हेवाट लावली तर त्याचा कोणाला त्रास होणार नाही व पर्यावरणासही बाधा पोहचणार नाही.- कैलाश मुरारका, अध्यक्ष, प्लास्टीव्हीजन इंडिया आयोजन समिती 

टॅग्स :Jalgaonजळगाव