शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर नेपाळ दूतावासाकडून हिरवा कंदील! गोरखपूरहून मृतदेह सरळ जाणार मयतांच्या गावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 10:59 IST

Jalgaon Train Accident: परधाडे, ता. पाचोरा येथील रेल्वे अपघातातील प्रवाशांचे मृतदेह नेपाळला नेण्यासाठी तिथल्या दूतावासाने राज्य शासनाला हिरवा कंदील दिला आहे.

जळगाव - परधाडे, ता. पाचोरा येथील रेल्वे अपघातातील प्रवाशांचे मृतदेह नेपाळला नेण्यासाठी तिथल्या दूतावासाने राज्य शासनाला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री भुसावळहून रेल्वेने निघालेले ६ जणांचे मृतदेह गोरखपूरपर्यंत आणि. तेथून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या नेपाळ सिमेवरुन संबंधित प्रवाशांच्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा आहे.

राज्यभरात मृतदेह नेण्यासाठी परवानगी देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. तर अन्य देशात नेण्यासाठी केंद्रीय पातळीवरुन परवानगी घ्यावी लागते. मात्र मुख्यमंत्री कार्यालयासह आपत्ती व्यवस्थापन विभागाने मयत प्रवाशांचे मृतदेह नेपाळमध्ये नेण्यासाठी राज्य शासन खर्च करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. तर केंद्रीय पातळीवरुनही सकाळपासूनच पाठपुरावा सुरु करण्यात आला. नेपाळमधील भारतीय दूतावासाने मयत प्रवाशांचे मृतदेह गोरखपूरपर्यंत पोहोच करुन नेपाळ सिमेवर आणल्यास नेपाळ शासनाच्यावतीने संबंधित मृतदेह त्यांच्या गावी पोहोचविण्याची तयारी दाखविली. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी मृत प्रवाशांचे दस्ताऐवज नेपाळ दूतावासाला पाठविले. 

मृतदेह पोहोच करण्यासाठी सर्व खर्च राज्य शासन करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी तशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच गिरीश महाजन यांनीही या प्रवासाच्यादृष्टीने मदतीचा हात दिला आहे.- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी.

उजनीच्या दुर्दैवी घटनेची २२ वर्षांनी पुनरावृत्तीबोदवड (जि. जळगाव)  : पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकादरम्यान पुष्पक एक्स्प्रेसचे प्रवासी कर्नाटक एक्स्प्रेसखाली चिरडले गेल्याच्या दुर्दैवी घटनेने तब्बल २२ वर्षांपूर्वी घडलेल्या दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या.  त्यावेळी तब्बल १७ प्रवासी गीतांजली एक्स्प्रेसखाली  चिरडले गेले होते. बोदवड तालुक्यातील उजनी येथे ही घटना घडली होती. 

टॅग्स :JalgaonजळगावIndian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघातNepalनेपाळ