लहान मुलांच्या भांडणावरून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST2021-05-26T04:17:38+5:302021-05-26T04:17:38+5:30

यावल : येथील बाबुजीपुरा परिसरात लहान मुलांच्या जुन्या भांडणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत एका गटाकडून तलवारीने ...

Fighting over children's quarrels | लहान मुलांच्या भांडणावरून हाणामारी

लहान मुलांच्या भांडणावरून हाणामारी

यावल : येथील बाबुजीपुरा परिसरात लहान मुलांच्या जुन्या भांडणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत एका गटाकडून तलवारीने व लोखंडी पाईपने मारहाण केल्याने तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. सात संशयितांविरुद्ध मारहाणीसह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, सकाळी १०.३० च्या सुमारास येथील बाबुजीपुरा परिसरात लहान मुलांच्या जुन्या भांडणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत संशयित आरोपी तन्वीर अब्दुल याने नईम उल्लाखान याच्या डोक्यात तलवार मारल्याने गंभीर जखमी झाले आहेत. सलीमबाबा याने हातातील पाईप रईस उल्लाखान याच्या पाठीवर, खांद्यावर मारल्याने जखमी झाले आहे. यासह अन्य एक असे तीन जण जखमी झाले. त्यांना जळगावला उपचारार्थ पाठविले.

सईद उल्लाखान याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी तन्वीर अब्दुल, तौकीफ अब्दुल सलीम, अब्दुल अजीज, हमीद अब्दुल अजीज, सैजात अब्दुल हमीद, शोएब अख्तर या सात जणांवर मारहाणीसह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार विनोद खांडबहाले करीत आहेत

Web Title: Fighting over children's quarrels