मळगावला पाणी अन् जगण्यासाठी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:10 IST2018-11-23T22:08:13+5:302018-11-23T22:10:23+5:30
भडगाव तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे सर्वत्र दुष्काळीस्थिती आहे. मळगाव येथील नागरिकांचा पाण्यासाठी आणि जगण्यासाठी संघर्ष सुरु असताना रोजगार व घोटभर पाण्यासाठी स्थलांतरीत होण्याची वेळ आली आहे.

मळगावला पाणी अन् जगण्यासाठी लढा
भडगाव : तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे सर्वत्र दुष्काळीस्थिती आहे. मळगाव येथील नागरिकांचा पाण्यासाठी आणि जगण्यासाठी संघर्ष सुरु असताना रोजगार व घोटभर पाण्यासाठी स्थलांतरीत होण्याची वेळ आली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच गावाला भीषण दुष्काळाच्या झळा बसत आहेत.
भडगाव तालुक्यातील मळगाव डोंगराळ भागात बसले आहे. तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या या गावाची ७५१ इतकी लोकसंख्या आहे. या परिसरात छोटे ३ पाझर तलाव आहेत. मात्र पावसाळा कमी झाल्यानंतर ते कोरडे पडतात. त्यामुळे नागरीकांना नेहमी पाणीटंचाईशी सामना करावा लागतो. यापूर्वीही गावाला टँकरने पाणी पुरवठा करावा लागला आहे.
नागरीकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व जनावरांचा पाण्याचा प्रश्न, चाºयाचा प्रश्न बिकट होत आहे. सद्यस्थितीला ४० टक्के लोक रोजगारासाठी परजिल्हयात स्थलांतरीत झाले आहेत.
मळगावात मुख्य व्यवसाय शेती आहे. शेती पाण्यावर अवलंबुन असते. येथे मात्र पावसाळयावर शेती अवलंबुन असते. कारण शेतशिवार कोरडवाहू अन् डोंगराळ भागात आहे. कपाशी, ज्वारी, बाजरी, तुर, मुग, उडीद यासह अन्य पिकांची पेरणी केली होती. कमी पावसामुळे जेमतेम उत्पन्न शेतकºयांच्या हाती आले. मुग, तुर, उडीद, सोयाबीन पिकाचा दाणाही आला नाही.
सतत दुष्काळी स्थितीशी सामना करीत यावर्षीही पिकांसाठी केलेला खर्चही शेतकºयांचा निघाला नाही. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पाऊस रुसला अन् बळीराजा दुखला अशी स्थिती या भागातील आहे.