लग्नपत्रिका वाटपासाठी निघालेले पिता- पुत्र अपघातात ठार

By Admin | Updated: May 2, 2017 16:57 IST2017-05-02T16:57:19+5:302017-05-02T16:57:19+5:30

मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटप करण्यासाठी येताना झालेल्या अपघातात धुळे येथील पिता व पुत्राचा मृत्यू झाला.

Father and son killed for distribution of marriage cards | लग्नपत्रिका वाटपासाठी निघालेले पिता- पुत्र अपघातात ठार

लग्नपत्रिका वाटपासाठी निघालेले पिता- पुत्र अपघातात ठार

 चाळीसगाव,दि.2 - मुलीच्या  लग्नाची पत्रिका वाटप करण्यासाठी येताना झालेल्या अपघातात धुळे येथील पिता व पुत्राचा मृत्यू झाला. खडकी सीम  फाटय़ादरम्यान मंगळवार 2 रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. 

धुळे येथील मार्केट यार्ड भागातील नवनाथ नगरातील रहिवासी नामदेव वामन वाडीले (वय 50), राकेश नामदेव वाडीले (वय 25) व यश संजय हरणे (वय 19) हे धुळ्याहून चाळीसगावकडे लग्नपत्रिका वाटपासाठी होते. त्यांच्या दुचाकीला धुळ्याकडे जाणा:या डंपरने (एमएच 45/1947) धडक दिल्याने नामदेव वाडीले व राकेश वाडीले हे दोघे पितापुत्र ठार झाले. तर यश हरणे हा जखमी झाला. नामदेव वाडीले यांच्या मुलीचा विवाह 18 रोजी धुळ्यात होणार असल्याने लग्नपत्रिका वाटपासाठी ते जात होते. (वार्ताहर)

Web Title: Father and son killed for distribution of marriage cards