विजेच्या धक्क्याने बाप-लेकीचा मृत्यू; भाची जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 19:53 IST2025-12-05T19:52:36+5:302025-12-05T19:53:03+5:30
जळगावातील अक्सानगरातील घटना

विजेच्या धक्क्याने बाप-लेकीचा मृत्यू; भाची जखमी
जळगाव : शहरातील अक्सानगर परिसर संतोषी माता मंदिर रस्त्यावर ५ डिसेंबर शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीचा झटका बसल्याने बाप-लेकीचा मृत्यू झाला असून लहान भाची गंभीर जखमी झाली आहे.
यामध्ये साबीर खान नवाज खान ३५ (वडील) व आलिया साबीर खान १२ ( मुलगी) यांचा मृत्यू झाला आहे. तर मारिया फातिमा (वय ९) ही मुलगी जखमी झाली आहे. खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
साबीर खान नवाज खान यांची भाची फातिमा मारिया ही लोखंडाची वस्तू खेळत असताना घराच्या बाहेरून गेलेल्या विजेच्या तारेला ती वस्तू लागली, त्याच वेळी तिला शॉक लागला, तिला वाचवण्यासाठी तिचे मामा साबीर खान नवाज खान हे धावले असताना त्यांनाही विजेचा धक्का बसला...,त्या धक्क्यात ते दूर फेकले गेले, याचवेळी घरात असलेली त्यांची मुलगी आलिया साबीर खान ही धावत आली, तिला ही त्याचवेळी जबर धक्का बसला...विजेचा धक्का एवढा तीव्र होता की त्यात आलिया आणि तिचे वडील साबीर खान यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.