शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
2
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
3
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
4
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
5
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
6
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
7
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
8
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
9
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
10
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
11
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
12
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
13
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
14
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
15
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
16
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
17
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
18
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
19
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
20
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसांपासून विज नसल्याने शेतकऱ्यांची महावितरणच्या कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST

जळगाव : धानवड, चिंचोली, कंडारी या गावांमध्ये कृषी पंपासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून विज पुरवठा खंडित असल्यामुळे, पिकांचे नुकसान होत ...

जळगाव : धानवड, चिंचोली, कंडारी या गावांमध्ये कृषी पंपासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून विज पुरवठा खंडित असल्यामुळे, पिकांचे नुकसान होत आहे. तक्रार करुनही विज पुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी जयकिसन वाडीतील कार्यालयावर धडक देऊन, कार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला. तसेच दोन दिवसात विज पुरवठा सुरळीत न केल्यास रस्ता रोको करण्याचा इशाही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

महावितरणतर्फे कृषी पंपासाठी वेळापत्रकानुसार आठ तास देण्यात येत असून, आतापर्यंत धानवड, उमाळा, चिंचोली, कंडारी या गावातही वेळापत्रकानुसारच विजपुरवठा देण्यात येत आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे शेतकरी बांधवांना पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. त्यामुळे मंगळवारी येथील १०० ते १५० शेतकरी बांधवांनी बुधवारी महावितरणच्या कार्यालयात येऊन पिकांच्या होत असलेल्या नुकसानीबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांनी जो पर्यंत वीज वितरणाचे व्यवस्थितपणे नियोजन केले जात नाही तोपर्यंत प्रभारी कार्यकारी अभियंता यांचे दालन न सोडण्याचा पवित्रा घेतला होता. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, यावेळी स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार शेतकरी बांधवांनी प्रभारी अभियंता एम. बी. चौधरी यांच्या निदर्शनास आणून दिला. यावेळी चौधरी यांनी संबधित अधिकाऱ्याला बोलवून घेत शेतकऱ्यांशी समन्वय ठेवावा व त्यांचा प्रत्येक फोन घेण्याची सक्त ताकीद दिली.

तर दोन दिवसांत रास्ता रोकोचा इशारा

शेतकऱ्यांसोबत ग्रामीण भागातील शिवसेनेचे युवा सेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, दिलीप चव्हाण, चिंचोलीचे शरद घुगे, युवा सेना तालुका सरचिटणीस अविनाश पाटील, जनार्धन पाटील, कालिदास पाटील, राकेश घुगे,

आबा घुगे, उमाळ्याचे माजी सरपंच अनिल खडसे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यांनी दोन दिवसात विज पुरवठा सुरळीत सुरू न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा दिला. तर शेतकरी बांधवांनी थेट उमाळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे.