जळगावात शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 04:16 IST2018-05-28T04:16:24+5:302018-05-28T04:16:24+5:30

सततच्या नापिकीमुळे हताश झालेल्या भास्कर वामन पाटील (५१, रा. देवळी ता. चाळीसगाव) या शेतकºयाने रविवारी दुपारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

Farmer suicides in Jalgaon | जळगावात शेतकऱ्याची आत्महत्या

जळगावात शेतकऱ्याची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - सततच्या नापिकीमुळे हताश झालेल्या भास्कर वामन पाटील (५१, रा. देवळी ता. चाळीसगाव) या शेतकºयाने रविवारी दुपारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
भास्कर पाटील यांची स्वत:ची सहा-सात एकर शेती आहे. घरची परिस्थिती जेमतेम, त्यात शेतात केलेल्या खर्चाच्या मानाने उत्पन्न निघत नसल्याने ते हताश झाले होते. त्यामुळे त्यांनी जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले असा परिवार आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाय योजना राबवल्या जात आहेत़, पण शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे़

Web Title: Farmer suicides in Jalgaon