शेत रस्त्याच्या वादातून शेतकऱ्यावर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:17 IST2021-07-30T04:17:21+5:302021-07-30T04:17:21+5:30

जळगाव : वडिलोपार्जित शेतरस्त्याच्या वादातून अशोक शिवाजी पाटील (वय ४५) या शेतकर्‍यावर चुलत भावानेच गोळीबार केल्याची घटना गुरुवारी दुपारी ...

Farmer fired over farm road dispute | शेत रस्त्याच्या वादातून शेतकऱ्यावर गोळीबार

शेत रस्त्याच्या वादातून शेतकऱ्यावर गोळीबार

जळगाव : वडिलोपार्जित शेतरस्त्याच्या वादातून अशोक शिवाजी पाटील (वय ४५) या शेतकर्‍यावर चुलत भावानेच गोळीबार केल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजता पळासखेडा, ता.भडगाव येथे घडली. यात पाठीला गोळी लागल्याने पाटील जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेत जखमी अशोक पाटील यांची आई सुशीलाबाई (वय ५५) व भाऊ किशोर (वय ३९) या दोघांना गोळी चाटून गेली. चुलत भाऊ विजय दोधा पाटील याने हा गोळीबार केल्याची माहिती अशोक पाटील यांनी रुग्णालयात पत्रकारांना दिली. अशोक यांच्या पाठीचा एक्स रे काढण्यात आला असून त्यात खांद्याच्या खाली बंदुकीची गोळी रुतलेली दिसून येत आहे. ही गोळी शस्त्रक्रिया काढून काढावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

गोळीबार करणारा विजय पाटील हा अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचा भडगाव तालुका अध्यक्ष आहे. त्याच्या कमरेला नेहमी पिस्तूल असते. हे पिस्तूल जप्त करावे व कठोर कारवाई करावी अशी मागणी अशोक पाटील यांनी केली.

Web Title: Farmer fired over farm road dispute