शेळावे येथे निरोप समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:12 IST2021-07-11T04:12:57+5:302021-07-11T04:12:57+5:30

रत्नापिंप्री, पारोळा : शेळावे केंद्रात निरोप समारंभाचा कार्यक्रम शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष गुणवंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख ...

Farewell ceremony at Shelave | शेळावे येथे निरोप समारंभ

शेळावे येथे निरोप समारंभ

रत्नापिंप्री, पारोळा : शेळावे केंद्रात निरोप समारंभाचा कार्यक्रम शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष गुणवंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

प्रमुख पाहुणे म्हणून पदवीधर शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष गिरीश वाणी होते. केंद्रप्रमुख जितेंद्र पवार यांची जळगाव तालुक्यात बदली झाल्याने त्यांना केंद्रातर्फे निरोप देण्यात आला.

केंद्रप्रमुख जितेंद्र पवार यांनी शेळावे केंद्राचा पदभार चांगल्याप्रकारे चार वर्षे सांभाळला तसेच केंद्रप्रमुख भाईदास पारधी गेल्या वर्षभरापासून केंद्राचा पदभार सांभाळला. ते वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्याबद्दल त्यांनाही निरोप देण्यात आला.

नवीन रुजू झालेले केंद्रप्रमुख गोविंदा मिस्त्री यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गिरीश वाणी, संजय चौधरी, वैशाली बोरसे यांनी मनोगत मांडले. सूत्रसंचालन भूषण पाटील यांनी केले, तर आभार हेमराज राजपूत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगदीश पाटील, चंद्रकांत मोरे, दयानंद महाजन, विशाल देशमुख, रवींद्र नांद्रेकर, सूर्यवंशी, वैशाली बोरसे, शशिकला बोरसे यांनी केले.

Web Title: Farewell ceremony at Shelave