शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
2
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
3
२०२६ मध्ये पगारात वाढ होणार की वाट पहावी लागणार? आठव्या वेतन आयोगाबद्दल मोठी अपडेट
4
'...तर आमच्या देशातून तुम्हाला बाहेर काढू', भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकन सरकारचा स्पष्ट इशारा
5
BMC Election 2026: मुंबई शिंदेसेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, पोटात खुपसला चाकू
6
लिहून घ्या! युतीत राज ठाकरे यांचा सर्वात मोठा तोटा होईल; CM देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
7
India-Israel: पंतप्रधान मोदींना नेतान्याहूंचा फोन; दहशतवादाविरुद्ध भारत-इस्रायल एकत्र!
8
“खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट”; एकनाथ शिंदे यांची भावनिक साद
9
IND vs NZ : श्रेयस अय्यरला मोठा दिलासा! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत खेळण्याचा मार्ग झाला मोकळा
10
"जे स्वतःला 'शेर' म्हणायचे, ते आता पळ काढत आहेत"; शिरसाटांचा जलील यांच्यावर हल्लाबोल
11
Viral Video: दोन बसच्या मध्ये रिक्षाला चिरडले! चालकाचा जागेवरच मृत्यू; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ पहा
12
Video: टोनी स्टार्क भाजप, तर हल्कला शिवसेनेकडून उमेदवारी; महाराष्ट्राच्या राजकारणात हॉलिवूडचे सुपरहिरो
13
WhatsApp सुरक्षित राहणार, पर्सनल चॅटची चिंता मिटणार; 'हे' आहेत ८ दमदार सिक्योरिटी फीचर्स
14
Video: तब्बल २.५ कोटींच्या पॅकेजची ऑफर; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यानं रचला नवा इतिहास
15
"त्यांना बोलायचं होतं की,...", रवींद्र चव्हाणांची चूक मुख्यमंत्री फडणवीसांनी सुधारली; लातुरमधील सभेत काय बोलले?
16
जगाला पैसे वाटणाऱ्या चीनवर किती कर्ज? भरभराटीच्या अर्थव्यवस्थेमागील काळे सत्य काय? धक्कादायक अहवाल
17
भारतीय बाजारात या दिवशी लॉन्च होणार Nissan Tekton; फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या सविस्तर
18
'आमचा लाडका...', विकी-कतरिनाने सांगितलं लेकाचं नाव; फोटो पोस्ट करत दाखवली झलक
19
सलग दुसऱ्यांदा PM बनण्यासाठी मेलोनींची नवी खेळी, ५३% जनतेच्या विरोधात जाऊन घेणार निर्णय
20
Hema Malini : "रोज रात्री कोणीतरी माझा गळा दाबतंय..."; हेमा मालिनींनी सांगितला थरकाप उडवणारा अनुभव
Daily Top 2Weekly Top 5

अफेअरची माहिती घरच्यांनी दिली; १६ वर्षाच्या मुलीने तरुणाच्या खुनाची चिथावणी दिली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 20:44 IST

जळगावात एका तरुणाच्या हत्या प्रकरणात अल्पवयीन मुलीचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

Jalgaon Crime: जळगावच्या  यावल तालुक्यातील २१ वर्षीय युवकाच्या हत्येप्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला शुक्रवारी सकाळी ताब्यात घेण्यात आले आहे. मयत तरुणाने तिच्या प्रेमसंबंधांची माहिती तिच्या पालकांना दिली होती. या रागातून तिनेच संशयितांना खुनासाठी चिथावणी दिल्याचे समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे ही अल्पवयीन मुलगी  नागपुरातील असून प्रेमप्रकरणातून ती जळगावात अनेकदा आली होती.

इम्रान युनूस पटेल (२१, रा. हनुमंतखेडा, ता. धरणगाव) याच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. ही घटना २९ ऑगस्ट रोजी रात्री घडली होती. या खुनानंतर ज्ञानेश्वर गजानन पाटील (१९) आणि गजानन रवींद्र कोळी (१९) हे दोघे स्वतःहून पोलिसात हजर झाले. पोलिसांच्या तपासात या गुन्ह्यात तुषार राजेश लोखंडे उर्फ जन्नत (वय १९) यांच्या सहभागाचीही पुष्टी झाली.

याबाबत पोलिसांनी नागपूर येथील एका अल्पवयीन मुलीची चौकशी केली होती. त्यानंतर या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीकडे संशयाने पाहिले गेले. तपासादरम्यान तिच्या विरोधात पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्या प्रेमसंबंधांची माहिती इम्रान याने तिच्या पालकांना दिली होती. तिनेच वरील दोघांना खुनासाठी चिथावणी दिल्याचे तपासात उघड झाले आहे.

या बालिकेची बाल अधिरक्षागृहात रवानगी करण्यात आली आहे. अन्य तीन आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तपास यावलचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल महाजन करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Affair exposed: Minor girl incited murder after parents informed.

Web Summary : A 16-year-old girl in Jalgaon incited the murder of a 21-year-old man after he revealed her affair to her parents. The girl, from Nagpur, frequently visited Jalgaon. Three suspects are in custody, and the girl is in juvenile detention.
टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी