सीमेवरील जवानांनी वेबिनारद्वारे व्यक्त केले अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:15 IST2021-08-01T04:15:36+5:302021-08-01T04:15:36+5:30

भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयातील माजी विद्यार्थी असलेल्या या सेनादलाच्या काश्मीरच्या गंदरबार जिल्ह्यातील रायफल वुमनपदावर कार्यरत रूपाली धनगर, पेरास्लायडिंग ...

Experiences expressed by border guards through webinars | सीमेवरील जवानांनी वेबिनारद्वारे व्यक्त केले अनुभव

सीमेवरील जवानांनी वेबिनारद्वारे व्यक्त केले अनुभव

भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयातील माजी विद्यार्थी असलेल्या या सेनादलाच्या काश्मीरच्या गंदरबार जिल्ह्यातील रायफल वुमनपदावर कार्यरत रूपाली धनगर, पेरास्लायडिंग विभागाचे दीपक पाटील, संदीप बडगुजर, बीएसएफचे जवान खलील तडवी, कोब्रा कमांडर चारुदत्त बडगुजर या पाचही सैनिकांनी आपल्या सीमेवरील व प्रशिक्षण दरम्यानच्या काळात आलेल्या अनुभव व चित्तथरारक माहिती देऊन सहभागींना मंत्रमुग्ध केले.

प्रारंभी सैनिक परिचय, प्रास्ताविक या कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ. मोहिनी उपासनी यांनी केले. स्वागतपर मनोगत भगिनी मंडळ व इनरव्हीलतर्फे अध्यक्षा पूनम गुजराथी यांनी केले. वेबिनारमध्ये सहभागी उपस्थितांपैकी ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालीवाल, सरला माळी, भावना गुजराथी, किरण पालीवाल, छाया गुजराथी आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले. सैनिकांना देशसेवेसाठी शुभेच्छा देत अभिनंदन केले.

संवाद साधत सैनिकांनी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमात प्राचार्य ईश्वर सौंदाणकर, इनरव्हील डिस्ट्रिक्ट चेअरमन अश्विनी गुजराथी, इनरव्हील क्लब सचिव मीना पोतदार, किरण पालीवाल व शंभराहून अधिक सदस्य व प्रतिनिधी सहभागी झाले होते. आभार पूनम गुजराथी यांनी मानले.

Web Title: Experiences expressed by border guards through webinars