ती परीक्षा आता ४ फेब्रुवारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 22:08 IST2021-01-19T22:08:21+5:302021-01-19T22:08:21+5:30
जळगाव : ग्राम पंचायत सार्वजनिक निवडणुकीमुळे १५ जानेवारी रोजीची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची पुढे ढकलण्यात आलेली ...

ती परीक्षा आता ४ फेब्रुवारीला
जळगाव : ग्राम पंचायत सार्वजनिक निवडणुकीमुळे १५ जानेवारी रोजीची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची पुढे ढकलण्यात आलेली ऑनलाईन परीक्षा आता ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
५ जानेवारीपासून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील हिवाळी परीक्षांना प्रारंभ झाला आहे. १५ जानेवारीला ग्राम पंचायत निवडणुकीसाठी मतदान असल्यामुळे या दिवशीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही ॲानलाईन परीक्षा ४ फेब्रुवारी रोजी पूर्वीच्याच वेळेत होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली.