निधी देऊनही कामे होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:18 AM2021-07-31T04:18:40+5:302021-07-31T04:18:40+5:30

चोपडा : शासनाने दिलेल्या पैशांवर जर जनतेची कामे होत नसतील तर अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे ...

Even with funding, the work is not done | निधी देऊनही कामे होईनात

निधी देऊनही कामे होईनात

Next

चोपडा : शासनाने दिलेल्या पैशांवर जर जनतेची कामे होत नसतील तर अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे खडे बोल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा बैठकीत नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावत धारेवर धरले.

शुक्रवारी दुपारी नवीन प्रशासकीय इमारतीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार लता सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी नगरपालिकेचे मंजूर कामे दोन दोन वर्षे होत नसतील तर असला हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. असे सांगत मुख्याधिकाऱ्यांना आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याचे आदेश दिले.

यावेळी पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात साठ हजार खावटी अनुदान मंजूर करण्यात आले. त्यापैकी चोपडा तालुक्यात सर्वात जास्त दहा हजार तीनशे प्रकरणे मंजूर करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. यावेळी योजनेतील खावटी किट लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्याचे आले.

अनेक गावातील ग्रामस्थांनी आपल्या भागातील समस्या मांडल्या. यावेळी प्रांत सीमा अहिरे, तहसीलदार अनिल गावीत, गटविकास अधिकारी भरतकुमार कोसोदे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे , मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रदीप लासुरकर, उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. मनोज पाटील, महावितरणचे उपविभागीय अभियंता एन. एस. रासकर, एस. एम. गायकवाड, निम्न तापी प्रकल्पाचे अभियंता रजनी देशमुख, पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप आराक, अडावदचे सहायक पोलीस निरीक्षक किरण दांडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गणेश पाटील, उपजिल्हा प्रमुख मुन्ना पाटील, चोपडा तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, यावल तालुका प्रमुख रवी सोनवणे, महिला तालुका प्रमुख मंगला पाटील, शहर प्रमुख नरेश महाजन, शहर प्रमुख आबा देशमुख, जिल्हा परिषद सदस्य हरीश पाटील, पंचायत समिती सदस्य व माजी उपसभापती एम. व्ही. पाटील, शिवसेनेचे गटनेते महेंद्र धनगर, नगरसेवक राजाराम पाटील, महेश पवार, किशोर चौधरी, प्रकाश राजपूत, नगरसेविका संध्या महाजन आदी उपस्थित होते.

कोट

आपण कुठल्याही राजकीय भूमिकेतून काम केलेले नाही. विरोधकांची सर्वात जास्त काम केली आहेत.- अविनाश गांगोडे, मुख्याधिकारी, चोपडा न.पा.

Web Title: Even with funding, the work is not done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.