श्रीगणेश मूर्तीची स्थापना विवेकानंद प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. सुरेंद्र सुरवाडे व उज्ज्वला सुरवाडे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पौरोहित्य मधुसूदन जोशी यांनी केले. प्रमुख पाहुणे शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर गोरे, विवेकानंद प्रतिष्ठानचे सहसचिव विनोद पाटील निवासी विभागाचे अध्यक्ष प्रदीपकुमार जंगले, मुख्याध्यापक जगदीश चौधरी, राजेंद्र पाटील, पालक गणेश पाटील आदी उपस्थित होते. पर्यावरणपूरक टाकाऊ नारळाच्या शेंड्यापासून मोठे नारळ तयार करण्यात आलेले आहे. आकर्षक देखावा तयार केला आहेत. नारळात गणपती बसविला आहे. संतोष जोशी, संजय आंबोदकर, संजय कानडे, गोपाळ कुरकुरे विवेक फेगडे राधेश्याम पाटील, भानुदास पाटील यांनी गणपतीची भजने गायली. पालकांना गणेश स्थापनेचा कार्यक्रम ऑनलाइन दाखविण्यात आला.
विवेकानंद प्रतिष्ठान निवासी विभागात विधिवत श्रीगणेशाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:18 IST