शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

गेल्या पाच वर्षात जिल्हाभरात १३८९ घरफोड्या, ३३६ खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:05 AM

४९६६ चोऱ्या तर २७७ महिलांच्या सोनसाखळ्या लांबविल्या

ठळक मुद्देतरीही परिक्षेत्रात जळगावच सरस

जळगाव : २०१४ ते २०१८ या पाच वर्षाच्या कालावधीत जळगाव जिल्ह्यात १ हजार ३८९ घरफोड्या झाल्या आहेत तर ४ हजार ९६६ चोºया झाल्या आहेत. याच कालावधीत ३३ खून झालेले असले तरी शंभर टक्केपेक्षाही जास्त गुन्हे उघडकीस आलेले आहेत. काही घटनांमध्ये पोलीस दलाला नियंत्रण मिळविता आले आहे, घरफोडीच्या घटनांमध्ये मात्र कमालीची वाढ झालेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात घरफोड्या होऊन देखील फक्त ३९० घरफोड्या उघड झालेल्या आहेत. गुन्ह्यातील वसुलीही नगण्यच आहे.२०१४ या वर्षात खून, सदोष मनुष्यवध, बलात्कार, विनयभंग, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोडी, दंगा, फसवणूक, ठकबाजी, सरकारी नोकरांवर हल्ला यासारखे ५ हजार ४३६ गुन्हे घडले तर ४ हजार ४३८ गुन्हे उघडकीस आले तर २०१८ मध्ये ५ हजार ९३ गुन्हे घडले तर ३ हजार ६८८ गुन्हे उघडकीस आले.२०१७ च्या तुलनेत ५८३ गुन्हे २०१८ मध्ये वाढले. खून, दरोडा व फसवणूक यासारखे गुन्हे उघडकीस आणण्यात यंत्रणेला यश आले आहे.तरीही परिक्षेत्रात जळगावच सरसजळगाव जिल्ह्यात घरफोडी, चोरीचा आकडा मोठा आहे तर उघडकीस आणण्याचे प्रमाण नगण्य आहे. असे असले तरी नाशिक परिक्षेत्रात जळगाव जिल्ह्यातच सर्वाधिक गुन्हे उघडकीस आले असल्याचे पोलीस दप्तरी असलेल्या नोंदीत आढळून आले.मोबाईल व दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने चोरीचा आकडा फुगलेला दिसून येत असल्याचा दावा पोलीस प्रशासनाकडून होत आहे. तरीही मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना आढळून येत आहे.तंत्रज्ञानच ठरतेय आधारगुन्ह्यांच्या पध्दती बदलल्या तशा गुन्हे उघडकीस आणणारे तंत्रज्ञानही विकसित झाले. जे गुन्हे उघडकीस आलेले आहेत ते मोबाईल, सीसीटीव्ही कॅमरे यासारख्या तंत्रज्ञानामुळेच उघड झाली. घरफोडी, खून, आॅनलाईन फसवणूक यासारख्या गुन्ह्यात त्याचा प्रभावी वापर झालेला आहे. पारंपारीक गुन्हे उघडकीस आणण्याची पध्दत आता लोप पावत चालली आहे, कि काम करण्याचीच मानसिकता बदलत चालली आहे, हे देखील एक कोडेच आहे. आॅनलाईन फसवणुकीचा आकडाही गेल्या काही दिवसात वाढला आहे.अवैध धंद्यावर नियंत्रणजिल्ह्यात गुन्ह्यांचा आकडा वाढलेला असताना दुसरीकडे सहा महिन्यात अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना यश आले आहे. काही वर्षाच्या कार्यकाळावर प्रकाशझोत टाकला तर तत्कालिन पोलीस अधीक्षक संतोष रस्तोगी यांच्या काळात अवैध धंदे नियंत्रणात होते, मात्र पूर्णपणेही बंद नव्हते. त्यानंतर आता धंदे शंभर टक्के बंद नसले तरी अपवादात्मक परिस्थितीत लपूनछपून धंदे सुरु आहेत. अवैध धंद्याशी संबंधित इतक्या मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचाºयांना निंयत्रण कक्ष व मुख्यालयात जमा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी