शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

वेळेत उपचार न मिळाल्याने रस्त्यातच महिला प्रसूत होऊन बाळाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 19:36 IST

रस्त्यातच रुग्णवाहिके त बिघाड झाल्याने पर्यायी रुग्णवाहिकेसाठी वारंवार संपर्क साधूनही एकही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने वेळेत उपचार होऊ शकले नाहीत, त्यामुळे धामणगाव येथील महिलेची बिघाड झालेल्या रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली आणि त्यात तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शनिवारी पहाटे ममुराबादजवळ घडली.

ठळक मुद्दे रुग्णवाहिकेत बिघाड  पाच १०८ रुग्णवाहिका असताना एकही आली नाही सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार

जळगाव : रस्त्यातच रुग्णवाहिके त बिघाड झाल्याने पर्यायी रुग्णवाहिकेसाठी वारंवार संपर्क साधूनही एकही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने वेळेत उपचार होऊ शकले नाहीत, त्यामुळे धामणगाव येथील महिलेची बिघाड झालेल्या रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली आणि त्यात तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शनिवारी पहाटे ममुराबादजवळ घडली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील धामणगाव येथील खटाबाई चंद्रभान सपकाळे (२४) या महिलेला शनिवारी सकाळी ४ वाजता प्रसूतीसाठी १०८  रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलवित असतांना वाटेतच ममुराबाद कृषी फार्मजवळ रुग्णवाहिकेत बिघाड झाला. पर्यायी रुग्णवाहिका मिळावी यासाठी कुटुंबिय तसेच रुग्णवाहिकेतील पारिचारिकेने तब्बल दोन तासात अनेकदा संपर्क साधूनही दुसरी  रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अखेर वाहनातच तिची प्रसूती होवून बाळाचा मृत्यू झाला. त्यामुळे या महिलेला खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. खासगी वाहनाने विवाहिता व बाळाला जिल्हा रुग्णालयात ४.३० वाजता जिल्हा रुग्णालयात आणले असता तेथे पाज रुग्णवाहिका थांबलेल्या दिसल्या. त्यामुळे चंद्रभान सपकाळे यांनी  रुग्णवाहिकेजवळूनच १०८ वर पुन्हा संपर्क साधला असता तेव्हाही त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे उत्तर मिळाले. यावेळी फोनवर बोलणाºया व्यक्तीला येथे पाच रुग्णवाहिका उपलब्धअसताना तुम्ही नाही का? सांगतात असा जाब विचारला असता समोरच्या व्यक्तीने फोन बंद केला.निष्पाप बाळाच्या मृत्यूला १०८ यंत्रणा जबाबदार असून संबंधितावर कारवाई व्हावी अशी मागणी चंद्रभान सपकाळे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव